नवी दिल्ली, 22 जानेवारी : शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते संजय राऊत नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. राऊत म्हणाले की, 'राहुल गांधी भारताचे पंतप्रधान बनण्यास सक्षम आहेत. लोकशाहीत जनतेचा निर्धार असेल तर कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. शुक्रवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत जम्मूला पोहोचले. ते म्हणाले की, 'कन्याकुमारी ते काश्मीर या प्रवासाचा उद्देश द्वेष आणि भीती दूर करणे हा आहे, विरोधी पक्षांना त्यांच्या पक्षाच्या बॅनरखाली एकत्र करणे नाही'.
एएनआयच्या वृत्तानुसार, राऊत यांनी शनिवारी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सांगितले की ते भारताचे पंतप्रधान बनण्यास सक्षम आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर हे 3,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर प्रत्येकजण पार करू शकत नाही, त्यासाठी खूप जिद्द आणि देशावर प्रेम हवे. त्यांनी देशाप्रती असलेली काळजी दाखवून दिली असून या भेटीत मला कोणतेही राजकारण दिसत नाही. त्यांना स्वतः पंतप्रधान होण्यात स्वारस्य नसले तरी जेव्हा लोकांना त्यांना सर्वोच्च पदावर पाहायचे असेल तेव्हा त्यांच्याकडे पर्यायच उरणार नाही.
वाचा - आम्ही दुखी आणि व्यथित, मुलाच्या निलंबनावर पहिल्यांदाच सुधीर तांबे बोलले
राऊत म्हणाले, 'कोणतीही आघाडी काँग्रेसशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. मी शिवसेनेच्या बाजूने आलो आहे. देशातील वातावरण बदलत आहे आणि मी राहुल गांधींना आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो. त्यांच्या समर्थनार्थ लोकांची गर्दी होत आहे आणि लोक त्यात सामील होत आहेत.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये संपणार आहे. याआधीच, काँग्रेस पक्षाने नवीन प्रचाराची घोषणा केली आहे, जी 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 130 दिवसांच्या ऐतिहासिक कार्यक्रमानंतर (भारत जोडो यात्रा) पक्षाने 'हाथ से हाथ जोडो अभियान' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस, केसी वेणुगोपाल यांनीही आपला लोगो शेअर केला आणि सांगितले की 'हाथ से हाथ जोडो मोहिमेचा मुख्य उद्देश मोदी सरकारच्या अपयशांवर प्रकाश टाकणे हा असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Sanjay raut