Home /News /national /

'राष्ट्रपती पदासाठी देशात शरद पवारांशिवाय इतर तगडा उमेदवार उरलाय का? भाजपकडे बहुमतही नाही', राऊतांचा दावा

'राष्ट्रपती पदासाठी देशात शरद पवारांशिवाय इतर तगडा उमेदवार उरलाय का? भाजपकडे बहुमतही नाही', राऊतांचा दावा

संजय राऊत म्हणाले की , शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर निवडणुकीतली हवाच निघून गेली आहे. पवारांनी नाही म्हटल्यामुळं देशात कुणी इतर तगडा उमेदवार उरलाय का

    मुंबई 17 जून : देशात १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होणार आहे. याआधी आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर (Presidential Election 2022) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पुढाकार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच भाजपसह इतर सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे. राष्ट्रपतीपद निवडणूक : 'या' तिघांच्या भूमिकेवर अवलंबून असेल एनडीए, यूपीएच्या मतांचं गणित यासोबतच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की , शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर निवडणुकीतली हवाच निघून गेली आहे. पवारांनी नाही म्हटल्यामुळं देशात कुणी इतर तगडा उमेदवार उरलाय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशाला आतापर्यंत मोजकेच राष्ट्रपती चांगले मिळाले. अन्यथा नेहमीच सत्ताधारी पक्षानी आपल्या मर्जीतील नेत्याला राष्ट्रपती पदावर निवडून दिलं आहे. यंदा शरद पवार या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर निवडणुकीत रंगत आली असती, असं वक्तव्य राऊत यांनी केलं. संजय राऊत म्हणाले, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शरद पवार उभे राहिले नाहीत. आता सत्ताधारी पक्षाकडून एखादं नाव पुढे येईल. कारण देशात त्या तुलनेत तगडा उमेदवारच नाही. आता या पदावर सत्ताधारी पक्षातला नेताच पाठवला जाणार. पवार यासाठी हो म्हणाले असते तर रंगत आली असती. पवारांच्या बाजूने पारडं झुकलंही असतं. सत्ताधारी पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाहीअसंही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचं मोदींसाठी 'Mission 26', भाजपच्या गोटात मोठं काहीतरी घडतंय दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता बोलावलेल्या बैठकीला 22 पक्षांना आमंत्रण दिलं होतं. मात्र यात फक्त 18 पक्ष सहभागी झाले. या बैठकीला ममता यांनी शरद पवार यांना उमेदवार होण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Election, President, Sanjay raut

    पुढील बातम्या