...आणि खासदार संजय राऊतांनी सांगितला सत्ता स्थापनेचा थरार!

...आणि खासदार संजय राऊतांनी सांगितला सत्ता स्थापनेचा थरार!

' डर के आगे जीत है...! महाराष्ट्राने डर को खतम किया... महाराष्ट्राने भिती मारली...! महाराष्ट्राने देशाला दिशा दिला. आता देशातील इतर राज्यातीले नेते ही म्हणतायेत ये हमारे यहा भी हो सकता है..!

  • Share this:

नवी दिल्ली 09 डिसेंबर : महाराष्ट्रातील थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांनी दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी सांगितला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवास्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे एकत्र स्नेह भोजन ४ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आलं होत. या स्नेह भोजनावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि अरविंद सावंत यांचा सत्कारही करण्यात आला होता. या स्नेह भोजनावेळी सर्व खासदारांच्या आग्रहाखातर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडद्यामागील सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव सांगितला. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला.

संजय राऊत म्हणाले, ' डर के आगे जीत है...! महाराष्ट्राने डर को खतम किया... महाराष्ट्राने भिती मारली...! महाराष्ट्राने देशाला दिशा दिला. आता देशातील इतर राज्यातीले नेते ही म्हणतायेत ये हमारे यहा भी हो सकता है..! हा 36 दिवसांचा जो राजकिय खेळ होता तो कमिटमेंटचा खेळ होता.

शरद पवारानंतर एकनाथ खडसे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार

मोदी पवार भेटीत काय झालं?

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असताना शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर ऐतिहासिक आघाडी करत सरकार स्थापनेचा घाट घातला जात होता,  तेव्हाच मोदी-पवार भेट झाली. या भेटीत नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी एका केला. पण हे अर्धसत्य असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भेटीबद्दल शरद पवार यांनी सांगितलं ती पूर्ण माहिती नाही. त्याआधी आणि नंतर काय बोलणं झालं हे कुणाला माहिती नाही, असं देवेंद्र म्हणाले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं.

पंतप्रधान मोदींबरोबरच्या भेटीत शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे झालं, पण त्यातला अर्धा भाग बाहेर आलेला नाही. ते पूर्णसत्य नाही. मोदी- पवार संवादातला काही भाग अद्याप बाहेर आलेला नाही. तो योग्य फोरमवर बाहेर येईल, असा दावा फडणवीस यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं सरकार स्थापन झाल्यावर सांगितलं. शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती."

CAB विधेयकावर बोलताना लोकसभेत शिवसेनेने अमित शहांना सुनावलं...

पवारांनी एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला होता. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाचीही ऑफर भाजपने दिली होती, असं पवार म्हणाले होते. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्या बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे मी त्याबद्दल आत्ता भाष्य करणार नाही. पण तिथे काय झालं याची मला माहिती आहे. योग्य वेळी योग्य व्यासपीठावर मी त्याबद्दल बोलेन."

Published by: Ajay Kautikwar
First published: December 9, 2019, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading