मराठी बातम्या /बातम्या /देश /

संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल; म्हणाले...'' हे मान्य आहे का?''

संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल; म्हणाले...'' हे मान्य आहे का?''

आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नितेश आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

    मुंबई, 14 मार्च: आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नितेश आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी (Sanjay Raut) थेट पंतप्रधान मोदींना (PM Modi) सवाल उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्याबद्दल राणे पुत्र बोलतात हे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का? असा सवाल संजर राऊत यांनी उपस्थित केला आहे. जर मान्य नसेल तर त्यांनी बोललं पाहिजे असंही राऊत म्हणालेत. हेही वाचा-  पुणेकरांसाठी Good News...! Corona संदर्भात आली मोठी अपडेट राजकीय मतभेद असू शकतात. मात्र जी भाषा शरद पवार यांच्याबद्दल वापरली जाते ती अत्यंत खालच्या स्तरावरची आहे. आम्ही काही बोललो तर आम्हाला पवारांचे चेले म्हणतात. हो आहे मी त्यांचा चेला. पण तुम्हाला अशी असंसदीय भाषा वापरणं शोभतं का? असंही सवाल संजय राऊत यांनी विचारलं आहे. गोव्यातल्या विजयावर राऊतांची टीका गोव्यात निवडणुका जिंकल्याचा कोणीही टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. महाराष्ट्राचे नेत्याचे स्वागत झालं आम्हाला देखील आनंद आहे. गोवा हे व्यक्ती राजकारण आहे. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. गोव्यात भाजपच नव्हे तर कोणीही असलं तरी वाद निर्माण होतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गोव्याचं राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात, असं ते म्हणालेत. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार असल्यानं भाजप कार्यालयात त्यांचं मोठं स्वागत झालं, ढोल वाजवले, लेझीम खेळले. विधानभवनातही त्यांचं मोठं स्वागत झालं. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Narendra modi, Sanjay Raut (Politician), Shiv sena

    पुढील बातम्या