...हा तर भाजपचाच विस्तार-संजय राऊत

...हा तर भाजपचाच विस्तार-संजय राऊत

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 4 कॅबिनेट तर 9 राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये सगळेच मंत्री हे भाजपचेच आहेत.

  • Share this:

मुंबई,03 सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज तिसऱ्यांदा विस्तार करण्यात आला. या विस्तारावर टीका करताना हा एनडीएचा नाही तर फक्त भाजपचाच विस्तार आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 4 कॅबिनेट तर 9 राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये सगळेच मंत्री हे भाजपचेच आहेत. नुकत्याच एनडीएत सामील झालेल्या जेडीयूला देखील एकही मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे यावरच टीका करताना 'हा विस्तार फक्त भाजपचा होता. एनडीएचा नव्हता. त्यामुळे इतरांना रागवायची गरज नाही. शिवसेना कोणत्याही निमंत्रणाची वाट पाहत नाही'. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना आणि जेडीयूला किमान एक तरी मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

First published: September 3, 2017, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading