Home /News /national /

भाजपकडून संभाजीराजेंचा गैरवापर : राऊत, ठाण्यात भीषण अग्नितांडव, भीम ब्रिगेडचा राणा दाम्पत्याला विरोध TOP बातम्या

भाजपकडून संभाजीराजेंचा गैरवापर : राऊत, ठाण्यात भीषण अग्नितांडव, भीम ब्रिगेडचा राणा दाम्पत्याला विरोध TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 29 मे : ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अंबिका नगरमध्ये आगीची मोठी घटना समोर आली आहे. शाहू महाराजांच्या भूमिकेवरुन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका महावितरणच्या (mahadiscom officers) अधिकाऱ्याला काम न झाल्यास थोबाडीत मारेन, अशी फोनवर धमकीच दिल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणं आता त्यांना चांगलच महागाच पडलं आहे. यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. ठाण्यात भीषण अग्नितांडव ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अंबिका नगरमध्ये आगीची मोठी घटना समोर आली आहे. ही आग आज रात्री दहा वाजेच्या सुमारास लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वागळे इस्टेट परिसरात रोड नंबर 29 मध्ये प्लॉट नंबर ए-202 मध्ये ही आग लागली होती. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी भाजपने संभाजी छत्रपतींचा गैरवापर केला : राऊत राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याची टीका संभाजीराजेंनी केली होती. त्यांच्या या टीकेवर त्यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी आज प्रतिक्रिया दिली. संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेले भाष्य योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. शाहू महाराजांच्या या भूमिकेवरुन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. Aryan Khan नंतर रिया चक्रवर्ती ड्रग केसचा फेरतपास करा : अ‍ॅड. सतिश मानेशिंदे बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा(Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (NCB) नुकतीच क्लीनचिट दिली आहे. आता यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (  rhea chakraborty  ) आणि शोविक चक्रवती ड्रग केसची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाषण थांबवून ओवेसींनी सभेत केली नमाज अदा एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांची भिवंडीत सभा पार पडली. यावेळी अजान सुरू झाली असता ओवेसींनी सभा थांबवून कार्यकर्त्यांसह व्यासपीठासमोरच नमाज अदा केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बच्चू कडूंनी महावितरणच्या अधिकाऱ्याला झापले राज्यमंत्री नसतानाही बच्चू कडू यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. पण, आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी एका महावितरणच्या (mahadiscom officers) अधिकाऱ्याला काम न झाल्यास थोबाडीत मारेन, अशी फोनवर धमकीच दिल्याचे समोर आले आहे. बच्चू कडूंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. PM मोदींवर टीका करणं दीपाली सय्यद यांना पडलं महागात, दीपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणं आता त्यांना चांगलच महागाच पडलं आहे. कारण यामुळं दीपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. वडिलांच्या टीकेवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आता आपल्या वडिलांच्या टीकेवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. संभाराजे यांचे वडील शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले पुत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेलं विधान योग्य नसल्याचं म्हटलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये राकेश टिकैत पुन्हा action mode वर आले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sambhajiraje chhatrapati, Sanjay raut

    पुढील बातम्या