Elec-widget

राज्यात सरकार स्थापन कधी होणार? संजय राऊत यांनी दिलं 'हे' उत्तर

राज्यात सरकार स्थापन कधी होणार? संजय राऊत यांनी दिलं 'हे' उत्तर

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरु आहे. यातच भाजपकडून आमचंच सरकार येणार असा दावा केला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याचं बघायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार याचे हे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जात आहे. आता भाजपप्रणित एनडीएचा भाग नसल्याने शिवसेना खासदारांच्या सभागृहात बसण्याच्या जागाही बदलणार आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदामुळे वाद झाला. त्यानंतर सेनेने काँग्रेस राष्ट्रावादीसोबत चर्चा सुरु केली आहे. दरम्यान, वेळेत सत्ता स्थापनेचा दावा कोणत्याही पक्षाला करता न आल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आता सत्ता स्थापना कधी होणार असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार स्थापना लवकरच होईल. आम्हाला आशा आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरकार स्थापन होईल.

दरम्यान संजय राऊत यांना एनडीएबद्दल विचारले असता ते म्हणाले की, भाजपसोबत कोणत्या नात्याची तुम्ही चर्चा करत आहात. त्यांचा एक मंत्री येतो आणि सांगतो की आम्ही एनडीएमध्ये नाही. ही तर एकतर्फी गोष्ट झाली ना? असा सवाल त्यांनी विचारला.

एनडीएमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अडचणी होत्याच. यामध्ये घटक पक्ष म्हणून पीडीपीला घेण्याचा प्रश्न होता. त्याविरुद्ध आम्ही सर्वात आधी आवाज उठवला पण ते ऐकून घेतलं नाही. जेव्हा एनडीए स्थापन झाली तेव्हा त्याला एकत्र बांधणारे प्रकाश सिंग बादल, बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी हे होते. आम्ही तर पहिल्यापासून होतो यामध्ये पण आज एनडीएमध्ये कोण आहे हेच माहिती नाही असंही संजय राऊत म्हणाले.

निवडणूकपूर्व युती करून भाजप-सेनेनं एकत्र निवडणुका लढवल्या. 2014 च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्याकडे बहुमत होतं. मात्र, सेनेनं मुख्यमंत्रिपदावर ठाम भूमिका घेतली. भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांच्याकडे जादुई आकडा नसल्यानं सत्ता स्थापन करू शकला नाही. त्यानंतर शिवसेनेलाही सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण दिलं. पण त्यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात काही ठरलं नसल्यानं पत्र मिळण्यास उशिर झाला. सेनेनंतर राष्ट्रवादीलाही राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावलं होतं. राष्ट्रवादीनेही वेळ वाढवून मागितली मात्र त्याला नकार देत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केली.

Loading...

राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? जयंत पाटलांनी केला खुलासा

राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...