मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या अमित शहांना राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले "ED, CBI, NCB ही तीन चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा"

मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या अमित शहांना राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले "ED, CBI, NCB ही तीन चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा"

मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या अमित शहांना राऊतांचं प्रत्युत्तर, "ED, CBI, NCB ही तीन चिलखतं उतरवून सामना होऊनच जाऊ द्या"

मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या अमित शहांना राऊतांचं प्रत्युत्तर, "ED, CBI, NCB ही तीन चिलखतं उतरवून सामना होऊनच जाऊ द्या"

Sanjay Raut on Amit Shah's open challenge: अमित शहा यांनी दिलेल्या आव्हानानंतर शइवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पुण्यात भाषण करताना शिवसेनेवर निशाणा साधला. यासोबतच राजीनामा देऊन निवडणुकीला सामोर जा, तिघांविरोधात लढा. मग बघा काय अवस्था होते' असं म्हणत अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या या ओपन चॅलेंज नंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी अमित शहांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Shiv Sena leader Sanjay Raut replied to Amit Shah's open challenge to CM Uddhav Thackeray)

भ्रमीत करण्याचा प्रयत्न सुरू

संजय राऊत म्हणाले, अमित शहाजी काल पुण्यात आले आणि त्यांचं जे काय वक्तव्य आहे ते पूर्णपणे असत्याला धरून आहे. ते नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या नेत्याविषयी, आमच्या भूमिकांविषयी, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन, अडीच वर्षांपासून भ्रमीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता विश्वास ठेवायला तयार नाही.

भाजप नेते वैफल्यातून बोलतायत

भाजपचं हे वैफल्य मी राज्यातील नेत्यांमध्ये पाहतोय, पण त्यांचे सर्वोच्च केंद्रीय नेतेही महाराष्ट्रात येऊन त्याच वैफल्यातून बोलत आहेत. हे जेव्हा मी पाहिले तेव्हा मी, मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारचे नेते या सर्वांना त्यांची दया आली आणि आश्चर्यही वाटलं असंही संजय राऊत म्हणाले.

वाचा : 'एकटं लढूनच दाखवा', अमित शहांचं थेट उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

हिंदत्वाचा मुद्दा शिवसेने सोडला नाही

संजय राऊत म्हणाले, हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने कधी सोडला नाही आणि सोडणारही नाही. 2014 साली आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना सत्तेसाठी.. फक्त सत्तेसाठी आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा असं राज्यातील भाजप नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते? हे अमित शहांनी स्पष्ट करावं.

तीन चिलखतं दूर करा आणि लढा

महाराष्ट्राचं सरकार उत्तम चाललं आहे. केंद्राने प्रयत्न करुन सुद्धा सरकारचं एक कवचा सुद्धा उडालेला नाहीये याचं दु:ख आम्ही समजू शकतो. तुमच्या संपूर्ण यंत्रणा फेल गेल्या आहेत. आपण जे म्हणताय ना राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा... तुम्ही जी तीन-तीन चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय ना? सीबीआय, ईडी आणि एनसीबी ही तीन चिलखतं घालून तुम्ही आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताय ना... ही चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत आम्ही पाठीमागून हल्ले करत नाही. आम्ही समोरूनच लढतो आणि आत्तापर्यंत समोरुनच लढत आलो आहोत असंही संजय राऊत म्हणाले.

First published:

Tags: Amit Shah, Sanjay raut, Shiv sena