Home /News /national /

राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा COVIDE19 मुळे मृत्यू

राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा COVIDE19 मुळे मृत्यू

त्याच्या कुटूंबात 30 जण आहेत. त्या सगळ्यांना अद्याप कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

  नवी दिल्ली 19 एप्रिल: राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राहणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा कर्मचारी त्या नातेवाईकाच्या अत्यसंस्काराला उपस्थित होता आणि उपचार सुरू असताना तो हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहितीही पुढे आली आहे. विस्तिर्ण असेलल्या राष्ट्पती भवन परिसरातल्या सेक्शन ए गेट नं. 17 जवळ तो राहत होता. WHOच्या गाईडलाईन नुसार हा परिसर सील करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये हा कर्मचारी काम करत होता. त्याच्या कुटूंबात 30 जण आहेत. त्या सगळ्यांना अद्याप कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्या 30सही जणांना आपल्याच घरात आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं आहे. कोरोनाव्हायरसचा कहर जगभरात पसरत आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. येथे मृतांची संख्या साडेचारशेच्या वर गेली आहे. दरम्यान, लवकरच आपण या लहरी कोरोनाशी लढायला तयार होऊ, अशी आशा भारताच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. या दिशेने भारतीय शास्त्रज्ञ बहुउद्देशीय लसची चाचणी घेत आहेत. COVID 19 : सर्व्हे करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकावर चाकू हल्ला, एक जखमी सीएसआयआर डीजी शेखर मंडे यांचा हवाला देताना एनडीटीव्ही म्हणाले की, भारत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस तयार करण्याच्या कामात गुंतलेला आहे आणि येत्या काही काळात त्याचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, '' आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ची परवानगी घेऊन कुष्ठरोगाच्या उपचारातील प्रभावी लसची चाचणी सुरू केली आहे.

  कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच पुण्यासह देशभरातून आली आनंदाची बातमी

  आम्हाला अजून दोन मंजुरी मिळाल्या आहेत. अशी अपेक्षा आहे की एक किंवा दोन दिवसात ते मंजूर होईल आणि त्यानंतर आम्ही प्रयोग सुरू करू. येत्या काही आठवड्यांसाठी ही लस उपचारात किती प्रभावी आहे हे यातून समजेल.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या