बापरे ! सॅनिटरी पॅडमधून 3 कोटींच्या ड्रग्सची तस्करी; महिला गजाआड

बापरे ! सॅनिटरी पॅडमधून 3 कोटींच्या ड्रग्सची तस्करी; महिला गजाआड

ड्रग्स तस्करीसाठी महिलेनं चक्क सॅनिटरी पॅडचा वापर केला.

  • Share this:

बंगळूरू, 18 जून : ड्रग्स तस्करीसाठी विविध आयडिया वापरल्या जातात. त्यासाठी नवीन फंडे शोधले जातात. पण, पोलिसांच्या नजरेतून मात्र काहीही सुटत नाही. आतापर्यंत अनेक शक्कलबाजांना ड्रग्स तस्करी, सोनं तस्करी करताना पकडत जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. पण, कर्नाटकातील एका महिलेनं चक्क सॅनिटरी पॅडचा वापर हा ड्रग्सच्या तस्करीसाठी केला. पण, तब्बल 3 कोटींचं ड्रग्स पोलिसांनी जप्त केलं असून महिलेची रवानगी ही जेलमध्ये करण्यात आली आहे. सॅनिटरी पॅडमध्ये लपवलेलं 3 कोटींचं ड्रग्स दोहाला नेलं जात होतं. पण, विमानतळावर तपासणी दरम्यान ही शक्कल पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेसह 3 जणांना अटक केली. सध्या या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महिलेला ड्रग्स तस्करीचे पैसे दिले जाणार होते. अबु आणि मोहम्मद या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारत ते कतार या देशांदरम्यान ड्रग्स तस्करीचा आरोपींचा धंदा आहे. तर, बंगळूरूमध्ये त्यांचं मुख्य ठिकाण आहे.

30 कोटींचे ड्रग्स जप्त

आस्टिन टाऊनमधील ठिकाणांवर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये तब्बल 30 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले. बंगळूरू विमानतळावर अटक केलेल्या महिलेला पैसे देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. अटकेत असलेल्या आरोपींची रवानगी तुरूंगात करण्यात आली असून या सर्व प्रकरणाची आता चौकशी करण्यात येत आहे. बंगळूरू सध्या ड्रग्स तस्करांचा अड्डा झाला आहे. काही दिवसांपूर्वी नार्कोटीक्स विभागानं टाकलेल्या धाडीत 500 कोटींचं केटामाईन ड्रग्स जप्त करण्यात आले होते. तबला, हार्मोनियम आणि गिराटरच्या मदतीनं केटामाईनची तस्करी केली जात होती. याप्रकरणात दक्षिण भारतातील सर्वात मोठा ड्रग्स माफिया शिवराजला अटक करण्यात आली होती. त्याचा कारभार हा ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला आहे.

VIDEO : आक्रमक विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, या आणि इतर 18 बातम्या

First published: June 18, 2019, 12:36 PM IST
Tags: drugs

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading