नीरव मोदीनं केलेला PNB नाही तर हा आहे सर्वात मोठा घोटाळा, EDचा खुलासा

नीरव मोदीनं केलेला PNB नाही तर हा आहे सर्वात मोठा घोटाळा, EDचा खुलासा

PNB घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा असं मानला जात होतं. पण, EDनं नवा खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जून : पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी असलेल्या नीरव मोदीनं 13 हजार कोटींचा चुना लावला. त्यानंतर परदेशी पळालेला नीरव मोदी आता वेस्टमिनस्टर येथे जेलमध्ये आहे. नीरव मोदीनं केलेला घोटाळा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं बोललं जात होतं. पण, EDनं आता देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. या घोटाळ्यामध्ये आता संदेसरा ब्रदर्सनं केलेला घोटाळा सर्वात मोठा आहे. स्टर्लिंग बॉयोटेक कंपनीचा मालक संदेसरा ग्रुपचा प्रमोटर नितिन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी एकत्र येत खोट्या कंपन्यांची स्थापना केली. या खोट्या कंपन्यांच्या माध्यमातून बँकांना तब्बल 14, 500 कोटींचा चुना लावला. EDच्या सुत्रांनी ANIला याबाबतची माहिती दिली आहे.

Alwar Mob Lynching : भाजप ते काँग्रेस; सरकार बदलले आणि पीडितच झाला आरोपी!

9 हजार कोटींची संपत्ती जप्त

दरम्यान, या प्रकरणात आता EDनं बुधवारी स्टर्लिंग बॉयोटेक कंपनीची 9000 कोटींपेक्षा देखील जास्त संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये विमान, लंडनमधील एका अलिशान बंगल्याचा देखील समावेश आहे.

भारतीय बँकांच्या परदेशी शाखांमधून घेतलं कर्ज

स्टर्लिंग बॉयोटेक कंपनीनं भारतीय बँकांच्या परदेशी शाखांमधून 9000 कोटींचं कर्ज घेतलं होतं. कर्ज घेणाऱ्या बँकांमध्ये आंध्रा बँक, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

एक देश, एक रेशन कार्ड; काय आहे केंद्र सरकाची योजना?

CBIनं दाखल केली FIR

ऑक्टोबर 2017मध्ये संदेसरा ग्रुपविरोधात CBIनं FIR दाखल केली होती. CBIनं 5383 कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी FIR दाखल केली होती.

बँकांना चुना लावून उद्योगपती फरार

दरम्यान, यापूर्वी विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकांना चुना लावून परदेशी पळ काढला आहे.

वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: EDpnb scam
First Published: Jun 29, 2019 03:04 PM IST

ताज्या बातम्या