नाशिकच्या समृद्धी महामार्गाच्या निविदेचा मार्ग मोकळा, 50 टक्क्यांहून अधिक जमिनी प्रशासनाकडे

50 टक्क्यांहून अधिक जमीन ही प्रशासनाच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 516 हेक्टरची थेट खरेदी करण्यात आलीय. सिन्नर तालुक्यात 357 हेक्टरसाठी 367 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2018 12:21 PM IST

नाशिकच्या समृद्धी महामार्गाच्या निविदेचा मार्ग मोकळा, 50 टक्क्यांहून अधिक जमिनी प्रशासनाकडे

19 जानेवारी : नाशिकच्या समृद्धी महामार्गाच्या निविदेचा मार्ग मोकळा झालाय. 50 टक्क्यांहून अधिक जमीन ही प्रशासनाच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 516 हेक्टरची थेट खरेदी करण्यात आलीय. सिन्नर तालुक्यात 357 हेक्टरसाठी 367 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.

दरम्यान निविदेसाठी नियमानुसार 50 टक्क्यांपेक्षा जास्त जमीन आवश्यक असते. त्यामुळे हा टप्पा गाठल्याने नाशिक जिल्ह्यात हा निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झालाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून जमीन अधिग्रहणाच्या वादावरून समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. पाच भागांमध्ये हा ७०० किलोमीटरचा महामार्ग तयार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...