पर्रिकर सोडले तर सारेच आयाराम, गयाराम आणि घाशीराम - सामना

पर्रिकर सोडले तर सारेच आयाराम, गयाराम आणि घाशीराम - सामना

भाजपमध्ये आता गोव्यात पर्रिकरांनंतर कोण असा प्रश्न विचारला जात आहे

  • Share this:

मुंबई, १९ सप्टेंबर- गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकरा स्थापन करून लोकशाहीचा अपमान केल्याचे शिवसेनेने म्हटले. सामना मुखपत्राच्या संपादकीयमधून गोव्याच्या राजकारणावर विशेष लेक लिहिण्यात आला. या लेखातून सेनेने भाजपवर सरळ टीका केली आहे.

पर्रिकरांची प्रकृती ढासळली आहे. पर्रिकर हे भाऊसाहेब बांदोडकरांनंतरचे सर्वात लोकप्रिय नेते. ते लवकर बरे व्हावेत म्हणून संपूर्ण गोवा देवाकडे प्रार्थना करत आहे. मंदिरांपासून ते चर्चपर्यंत सगळीकडेच त्यांच्या दिर्घायुषासाठी प्रार्थना केली जात आहे. मात्र पर्रिकरांनंतर भाजपकडे गोव्याचा कारभार पाहिलं असा एकही शुद्ध नेता नाही. एखादा नेता वगळतास सगळेच आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत. राजकीय अस्थिरतेमुळे गोव्याची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. तोडून- मोडून बनवलेले हे सरकार भाजप सरकारला फळले नाही.

गेल्या वर्षभरापासून पर्रिकरांची प्रकृती ढासाळत आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर दोन- चार नेत्यांच्या प्रकृतीतही बिघाड झाला. त्यामुळे सध्या गोव्याचे मंत्रिमंडळ अतिदक्षता विभागात असल्याचे शिवसेनेच्या मुखपत्रात लिहिण्यात आले आहे. गोव्याच्या सध्याच्या स्थितीला भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार असून या सरकारला मंदिरं आणि चर्चही वाचवू शकली नाही.

भाजपमध्ये आता गोव्यात पर्रिकरांनंतर कोण असा प्रश्न विचारला जात आहे. पर्रिकरांना सन्मानाने निवृत्त करून दुसरा नेता शोधण्याचे भाजपने ठरवले, तरी त्यांच्याकडे पर्रिकरांच्या तोडीचा एकही नेता नाही. श्रीपाद नाईक हे सध्या दिल्लीत आहेत. ते सोडले तर इतर सगळेच नेते हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत.

गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची मोट बांधून भाजप सरकारने गोव्यात सत्ता स्थापन केली आणि त्याचे नेतृत्त्व स्थापन करण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्र्याला पुन्हा एकदा गोव्यात जाऊन बसवले. पर्रिकरांना केंद्रातून गोव्यात पुन्हा पाठवणे ही भाजप सरकारची सर्वात मोठी चूक होती. मुळात पर्रिकरांना दिल्लीत बसवून गोव्याची नवी घडी बसवता आली असती आणि राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रिकरांनंतर कोण हा प्रश्न आज विचारावा लागला नसता. त्यामुळे आयाराम, गयाराम आणि घाशीराम यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली की काय होते हे सध्या गोव्यात दिसत आहे.

VIDEO : अन् सभागृहात कोसळला लाकडी ठोकळा; विरोधी पक्षनेते बसले हेल्मेट घालून!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 09:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading