भारत - पाकमधील 'समझौता' पुन्हा ट्रॅकवर

भारत - पाकमधील 'समझौता' पुन्हा ट्रॅकवर

भारत - पाकिस्तानमध्ये धावणारी समझौता एक्सप्रेसबद्दल भारतानं मोठा निर्णय गेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 मार्च : पुलवामा हल्ला, त्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून केलेला एअर स्ट्राईक यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले. अशा परिस्थितीमध्ये अटारी जवळ पाकिस्ताननं समझौता एक्सप्रेस रोखून धरली. त्यानंतर भारतानं समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, आता समझौता एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3 मार्चपासून समझौता एक्सप्रेस पुन्हा धावणार आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

एअर स्ट्राईक करत भारतानं बालाकोट येथे 200 ते 300 दहशतवाद्यांना यमसदनीस धाडलं. त्यानंतर पाकिस्ताननं देखील भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, यामध्ये भारतानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. तर, मिग - 21 क्रॅश झाल्यानं पाकिस्तानच्या हद्दीत उतरलेले विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं होतं. पण, भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमतं घेत पाकिस्ताननं अखेर त्यांची सुटका केली. अशा या घडामोडींमध्ये समझौता एक्सप्रेस कायम स्वरूपी रद्द करण्याचा निर्णय भारतानं घेतला होता.


हेही वाचा - '35 दहशतवाद्यांचे शव आम्ही पाहिले, पाक सैन्यानं हिसकावले लोकांचे मोबाइल'


संरक्षण मंत्र्यांनी घेतली अभिनंदनची भेट


भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची तब्बल तीन दिवसांनंतर पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली. शुक्रवारी रात्री अभिनंदन मायदेशी सुखरूप परतले. या ढाण्या वाघाच्या भारतवापसीचा आणि सुखरूप सुटकेचा देशभरात जल्लोष सुरू आहे. शिवाय, केवळ देशातच नाही तर परदेशातही अभिनंदन यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, अभिनंदन यांची विचारपूस करण्यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी शनिवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

यावेळी संरक्षणमंत्री सितारमन यांच्यासोबत वायुदलाचे काही अधिकारीदेखील हजर होते.

VIDEO : ओसामानंतर दिग्विजय सिंग यांनी केली इम्रान खान यांची स्तुती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या