• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आंध्र प्रदेशातली ही तरुणी सायकलवर फिरलीय तब्बल 20 देश, चढायचा आहे एव्हरेस्ट

आंध्र प्रदेशातली ही तरुणी सायकलवर फिरलीय तब्बल 20 देश, चढायचा आहे एव्हरेस्ट

समीरा खान ही सायकलिस्ट तरुणी सायकलवर जगभर फिरून आली आहे. तिची महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न अजूनही मोठी आहेत.

 • Share this:
  हैद्राबाद, 10 फेब्रुवारी : असं म्हणतात की कुटुंबाचा पाठिंबा असेल तर मुली-महिला काहीही करू शकतात. मात्र आंध्र प्रदेशातील एका मुलीनं कुठल्याही पाठिंब्याविना हे केलं जाऊ शकतं हे सिद्ध केलं आहे. गिर्यारोहक (mountaineer) आणि सायकलिस्ट समीरा खान आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अनंतपूर इथं राहते. ती नऊ वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचं (mother) निधन झालं. 2015 मध्ये तिचे वडीलही गेले. मात्र समीरा खचली नाही. माउंट एव्हरेस्टवर (mount Everest) चढण्याच्या आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ती कठोर मेहनत घेते आहे. समीरानं आजवर सायकलवर (cycle) तब्बल 20 देशांची यात्रा केली आहे. ती एक सोलो ट्रॅव्हलर (solo traveler) आहे. तीस वर्षांची समीरा नेपाळच्या (Nepal) 6,858 मीटर उंचीवरच्या अमा डबलामची चढाई केलेली आहे. हेही वाचा http://तब्बल 9 महिने दिली झुंज; अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीनं अखेर कोरोनाला हरवलंच समीरा सगळ्या जगाला सांगू इच्छिते, की भारतातील सगळ्या मुलींना आपल्या पालकांच्या (parents) प्रोत्साहनाची गरज आहे. अर्थात, समीरानं आजवर सगळंच स्वतःच्या बळावर केलं आहे. आता मात्र तिला आपलं लक्ष्य गाठण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. समीराला माउंट एव्हरेस्टची चढाई नेपाळऐवजी (Nepal) तिब्बतच्या बाजूनं करायची आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर समीरानं मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचा कोर्स केला. कुटुंबाच्या (family) आर्थिक अडचणींकडे पाहून तिनं बंगळुरूचं (Bangalore) एक कॉल सेंटर जॉईन केलं. समीरा आपल्या बचतीच्या पैशातून सोलो ट्रॅव्हलिंग करू लागली. ती आजवर काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळ, भूटान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात ट्रेकिंग करून आली आहे. हेही वाचा 70 फुटांवरून कोसळला ट्रक; पण ड्रायव्हरला खरचटलंही नाही; अपघाताचा LIVE VIDEO समीराला वाटतं, की सायकलिस्ट (cyclist) बनण्यामुळं तिचा आत्मविश्वास खूप वाढला. सध्या ती हैद्राबादच्या (Hyderabad) केपलर होम सिनेमामध्ये काम करते आहे. तिला दक्षिण भारतीय महिलांसमोर एक आदर्श घालून द्यायचा आहे. तिला आपला प्रवास आणि संघर्ष सांगण्यासाठी एक पुस्तकही लिहायचं आहे. सोबतच तिला एक माहितीपटही बनवण्याची इच्छा आहे.
  Published by:News18 Desk
  First published: