एकसारखी नावे असलेल्या औषधावंर आता येणार बंदी!

एकसारखी नावे असलेल्या औषधावंर आता येणार बंदी!

एकसारख्या नावांमुळे अनेक रूग्णांना चुकीची औषधे खावी लागतात. त्यामुळे अशा एकसारखी नावे असलेल्या औषधांवर सरकार आता बंदी घालणार आहे.

  • Share this:

8 मार्च,नवी दिल्ली : एकसारख्या नावांमुळे अनेकदा रुग्ण चुकीची औषधं घेतात. यामुळे त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. अनेकदा प्राणही गमवावा लागतो. यावर उपाय म्हणून आता सरकारने एकसारखी नावे असलेल्या औषधांवर सरकार आता बंदी घालणार आहे. ग्राहकांना आपल्या वस्तूकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. जसं की एखाद्या वस्तूला बाजारात प्रचंड खप असेल तर प्रतिस्पर्धी कंपन्या  त्यासारखंच मिळतं-जुळतं नाव देऊन ती वस्तू विकतात. यामध्ये वैद्यकीय औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्या अग्रेसर आहेत.

यामुळे होतं असं की नाव मिळतं-जुळतं असल्याने औषधांबद्दल फारशी माहिती नसलेल्या ग्राहकांसोबतच सुशिक्षित ग्राहकसुद्धा औषध घेताना अनेकदा फसतात. त्यांना ज्या कंपनीचे औषध हवे असते ते न घेता त्या नावाच्या एकसारखेपणामुळे ते दुसऱ्याच कंपनीचे औषध घेतात. अशी चुकीची औषधे घेतल्यामुळे रुग्णांना  याचा त्रासही सहन करावा लागतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सरकारने याविरोधात एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार बाजारात एकसारख्या नावाने विकल्या जाणाऱ्या औषधांवर सरकार बंदी घालणार आहे. सरकारची ही अधिसुचना  45 दिवसांनंतर प्रभावी मानली जाईल.

रुग्णांची होणारी ही जिवघेणी फसवणूक थांबवण्यासाठी सरकार आता कायदा करणार आहे. या कायद्यानुसार औषधी कंपन्यांना इथुन पुढे आपल्या औषधाचे नाव औषध नियंत्रकाकडे रजिस्टर करणे अनिवार्य असेल. यासोबतच बाजारात अशा नावासारखी किंवा अशा नावाची दुसरी कोणती औषधं नाही याचे खात्री प्रमाणपत्र द्यावे लागेल.

सध्या आपल्याकडे औषधांची नावे नोंदणी करणे सक्तीचे  नाही, त्यामुळे अशा एकसारख्या नावाची औषधं बाजारात आणण्याच्या स्पर्धेला ऊत आला आहे. अशा मिळत्या-जुळत्या औषधांच्या नावामुळे औषध विक्रेते ग्राहकांना चुकीची औषधे देतात. सध्या आपल्याकडे औषधे जेनेरिक नावाने रजिस्टर नोंद केली जातात.

या कायद्यानुसार आता औषध कंपन्याना जेनेरिक नावासोबतच त्यांच्या ब्रॅंडचे नाववही नोंद करावे लागेल. सध्या बाजारात 10 हजारहून अधिक एकसारख्या नावाची औषधे विकली जातात. या एकसारखी नावे असलेल्य़ा औषधांचे प्रमाण एकूण बाजाराच्या 25% इतके प्रचंड आहे.

उंदराने चोरले कोट्यवधींचे हिरे, CCTV VIDEO व्हायरल

First published: March 9, 2019, 4:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading