नरेंद्र मोदी नाही आता संबित पात्रा लढणार या जागेवरून

नरेंद्र मोदी नाही आता संबित पात्रा लढणार या जागेवरून

पुरीमधून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

भुवनेश्वर, 23 मार्च : भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी रात्री तिसरी यादी जाहीर केली. दरम्यान, पुरी या जागेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. पण, ओडिसातील पुरीमधून आता संबित पात्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 36 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली. यामध्ये आंध्र प्रदेशातील 23, महाराष्ट्रातील 6, ओडिसामधील 5 आणि मेघालय आाणि आसाममधील प्रत्येकी एका जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आले. भाजपनं आत्तापर्यंत 220 उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.

याव्यतिरिक्त भाजपनं आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीकरता 21, ओडिसा विधानभेकरता 22 शिवाय मेघालयच्या सेलसेला पोटनिवडणुकीकरता देखील उमेदवार जाहीर केले.

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

SPECIAL REPORT : राजे, तुम्ही चुकला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 09:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading