Howdy Modi : इमरान खानची अवस्था कशी असेल? असं विचारताच संबित पात्रा ट्रोल

Howdy Modi : इमरान खानची अवस्था कशी असेल? असं विचारताच संबित पात्रा ट्रोल

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांची फिरकी घेण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना स्वत:ला ट्रोल व्हावं लागलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : रविवारी अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा सहभागी झाले होते. ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये 50 हजार भारतीय आणि अमेरिकन लोकांसमोर मोदींनी भाषण केलं.

दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत, असे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न टीका केली. मोदी आणि ट्रम्प यांनी परस्परस्तुती करून आणि भारत-अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच, इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिले. यानित्तिाने प्रथमच अमेरिकी अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये एखाद्या सभेला प्रथमच संबोधित केले.

जगभरात हाऊडी मोदीची चर्चा सुरू असताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक ट्विट करून पाकिस्तानची फिरकी घेतली. पण त्या नादात त्यांनाच ट्रोल व्हावं लागलं. संबित पात्रा यांनी ट्विट करून विचारलं की, आता पाकचे पंतप्रधान इमरान खान यांची अवस्था काय असेल? हा प्रश्न विचारताच अनेक युजर्सनी इमरान खानची खिल्ली तर उडवलीच पण पात्रा यांनाही ट्रोल केलं.

संबित पात्रा यांना एका डिबेट शोमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टार्गेट केलं जात आहे. आज इमरान खानला तसंच वाटत असेल जसं संबित पात्रांना डिबेट शोमध्ये 5 ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात असा प्रश्न विचारला होता तेव्हा वाटत होतं.

लोकांनी म्हटलं आहे की, इमरान खानदेखील तुमच्यासारखंच ट्रिलियनमध्ये शून्य किती हे मोजत असेल.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. 1000 हून अधिक व्हॉलिंटिअर्स (स्वयंसेवक) या कार्यक्रमासाठी गेली काही दिवस झटत होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 50 हजारहून अधिक नागरिकांनी नावनोंदणी केली होती. विशेष म्हणजे पोप यांच्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नेत्याच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

'हाऊडी मोदी' म्हणजे काय?

'Howdy' हा शब्द 'How do you do' याचं संक्षिप्त रूप आहे. 'Howdy' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'तुम्ही कसे आहात'. अमेरिकेतील पाश्चात्य राज्यांमध्ये 'Howdy' या शब्दाचा प्रयोग तेथील बोलीभाषेत प्रचलित आहे.

VIDEO: शिवच्या आईवर वीणाची जादू...सांगितला पुरणपोळीचा किस्सा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 02:19 PM IST

ताज्या बातम्या