PM मोदी नाही तर पुरी मतदारसंघातून भाजपचा 'हा' नेता मैदानात

PM मोदी नाही तर पुरी मतदारसंघातून भाजपचा 'हा' नेता मैदानात

भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आज पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महामंत्री सुनील बन्सल, महेंद्रनाथ पांडे, उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्या देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, बिहारमधील पाटणा साहिब या जागेवरून भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे बंडखोरी करतील, अशी चिन्ह आहेत. त्यामुळे या जागेवरून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे भाजपकडून मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरी या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता होती. मात्र आता या मतदारसंघातून संबित पात्रा हे भाजपचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी

आक . के. सिंह - आरा

राधा मोहन सिंह - पूर्व चंपारण

संजय जैस्वाल - पश्चिम चंपारण

राजीव प्रताप रूडी - सारण

अश्विनी चौबे - बक्सर

नितीन गडकरी - नागपूर

जोएल उराव - सुदंर गढ ( ओडिसा )

संबित पात्रा - पुरी ( ओडिसा )

किरण रिजिजू - अरूणाचल पश्चिम

रवि मोहन त्रिपुरा - त्रिपुरा ईस्ट

प्रतिमा भौमिक - त्रिपुरा वेस्ट

विजय चक्रवर्ती - गुवाहाटी

प्रधान बरुआ - लखीमपूर

रामेश्वर तेली - डिब्रूगढ

माला राजलक्ष्मी - टिहरी गढवाल

अजय टमटा - अल्मेडा

रमेश पोखरियाल निशंख - हरिद्वार

नव्या चेहऱ्यांना संधी

पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपनं देखील जोरदार तयारी केली आहे. उमेदवारांची निवड करताना भाजप मोठे निर्णय घेऊन काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. खासदारांच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा आढावा, जनमताचा विचार करता हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपनं काही सर्व्हे देखील केले आहेत. तिकीट वाटपामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील जातीनं लक्ष घातलं आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूकदेखील वाढली आहे.


VIDEO: शरद पवारांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंची मोदींवर चौफेर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2019 02:49 PM IST

ताज्या बातम्या