शिवसेना नाही, हा आहे देशातला सर्वात श्रीमंत पक्ष!

शिवसेना नाही, हा आहे देशातला सर्वात श्रीमंत पक्ष!

विविध कंपन्यांनी दिलेल्या देणग्या, सदस्यत्व फी, लोकांनी दिलेलं दान हे या पक्षांच्या मिळालेल्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 8 मार्च  : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्व पक्षांना चिंता पडलीय आता प्रचाराची आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची. राष्ट्रीय पक्षांना पैशाची फारशी चिंता नसली तरी प्रादेशिक पक्षांना पैशाची चिंता कायम असते. प्रादेशिक पक्षांमध्ये समाजवादी पक्ष सर्वात श्रीमंत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतर तामिळनाडूचा डीएमके आणि तेलंगणाचा टीआरएस हे पक्ष श्रीमंत आहेत. Association for Democratic Reforms (ADR) यांनी केलेल्या पाहाणीत हे आढळून आलं आहे.

ADR ने देशातल्या 37 प्रादेशिक पक्षांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला 2017-18 मध्ये या सर्व पक्षांच एकूण उत्पन्न हे 237.27 कोटी रुपये आहे.

या पक्षांमध्ये समाजवादी पक्षाचं उत्पन्न सर्वात जास्त असून ते  47.19 कोटी रुपये एवढं आहे. 37 पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ते 19.89 टक्के एवढं होतं. डीएमकेचं उत्पन्न 35.748 कोटी तर टीआरएसचं उत्पन्न 27.27 या तीन पक्षांचं उत्पन्न 110.21 कोटी एवढं असून त्याचा वाटा 46.45 टक्के एवढा होतो. मुंबईवर वर्चस्व असलेला शिवसेना हा श्रीमंत पक्ष आहे अशी समजूत होती मात्र समाजवादी पक्ष जास्त श्रीमंत ठरला.

हे तीन श्रीमंत पक्ष वगळून इतर 34 पक्षांच्या उत्पनात 2017-18 मध्ये 42 टक्क्यांची घट झाली. 2016-17 मध्ये ते 409.64 कोटी एवढं होतं. विविध कंपन्यांनी दिलेल्या देणग्या, सदस्यत्व फी, लोकांनी दिलेलं दान हे या पक्षांच्या मिळालेल्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 8, 2019, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading