Home /News /national /

...तर मुली अश्लील व्हिडीओ पाहतील, सपा नेत्याची जीभ घसरली

...तर मुली अश्लील व्हिडीओ पाहतील, सपा नेत्याची जीभ घसरली

MP ST Hasan

MP ST Hasan

केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय(Women’s Marriage Age) घेतला आहे. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

    नवी दिल्ली, 18 डिसेंबर: केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय(Women’s Marriage Age) घेतला आहे. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party)खासदाराने यावर प्रतिक्रीय देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन (MP ST Hasan) यांनी, मला वाटतं की, जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न 16 व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही. असे सांगत लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ (पोर्नोग्राफी) पाहत बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवे असे हसन यांनी म्हटले आहे. तसेच "जर मुलगी 18 व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच, हसन यांनी "जर लग्न लवकर झालं तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात, कारण प्रजननक्षमतेचे (फर्टिलिटी) वय 15 ते 30 वर्षे आहे. अशा स्थितीत लग्नाचे वय वाढवू नये" असे म्हटले आहे. विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला मंजुरी दिली. सोमवारी संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. सध्या देशात मुलीच्या लग्नासाठी किमान 18 वर्षे वयाची अट आहे. गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी दिल्या होत्या. केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय(Women’s Marriage Age) घेतला आहे. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Marriage

    पुढील बातम्या