नवी दिल्ली, 22 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून आता राहुल गांधी यांच्या जवळचे म्हणून ओळख असलेले आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानावरून वाद होण्याची शक्यता आहे. 'मला हल्ल्यांबाबत जास्त काही माहीत नाही. पण, हल्ले होत राहतात. मुंबईवर देखील हल्ला झाला होता. त्यावेळी देखील एअर स्ट्राईक करता आला असता. पण, ते चुकीचं होतं. माझ्या मताप्रमाणे जगात वागण्याची ही पद्धत बरोबर नाही.'
Sam Pitroda,Indian Overseas Congress Chief on #airstrike: If you say 300 people were killed,we all need to know that ,all Indians need to know that. Then comes the global media which says nobody was killed,I look bad as an Indian citizen. https://t.co/TVUrwR5Q0a
'काही लोक येतात आणि हल्ला करतात. त्यासाठी आपण संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार कसं ठरवणार?' असा सवाल यावेळी सॅम पित्रोदा यांनी केला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी त्यांनी 'एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले म्हणता. त्याला पुरावा काय?' असा सवाल केला आहे. दरम्यान, पित्रोदा यांच्या या विधानावर भाजपनं जोरदार टीका केली आहे.
Sam Pitroda,Indian Overseas Congress Chief on #airstrike: I would like to know more as I have read in New York Times &other newspapers, what did we really attack, we really killed 300 people? pic.twitter.com/oRacba2jtE
'मी न्यू यॉर्क टाईम्स आणि इतर काही पेपर वाचले आहेत. त्यामुळ खरंच हल्ला करण्यात आला होता का? असा सवाल देखील निर्माण होतो.' असं देखील पित्रोदा यांनी यावेळी म्हटलं आहे. 'मी सवाल केले म्हणून मला देशविरोधी ठरवता येत नाही. शिवाय, मी या बाजूचा की त्या बाजूचा हे देखील ठरवता येत नाही' असं देखील यावेळी पित्रोदा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नाही असं विधान केलं होतं.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली होती. दरम्यान, त्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दोन्ही देशांमधील संबंध हे ताणले गेले आहेत. दरम्यान, पाकिस्ताननं देखील भारताला जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती.
VIDEO : भारतीय जवानांनी केला 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरचा खात्मा