राम मंदिर : सुप्रीम कोर्टाने एका दगडात मारले 2 पक्षी, सलमान खुर्शीद यांची टिप्पणी

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अयोध्या प्रकरणी मध्यस्थ नेमून सुप्रीम कोर्टाने एका दगडात 2 पक्षी मारले, अशी प्रतिक्रिया सलमान खुर्शीद यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2019 06:25 PM IST

राम मंदिर : सुप्रीम कोर्टाने एका दगडात मारले 2 पक्षी, सलमान खुर्शीद यांची टिप्पणी

नवी दिल्ली, 8 मार्च : राम जन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केलेल्या मध्यस्थांच्या नियुक्तीचं काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी स्वागत केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने अनेक उद्दिष्ट साध्य केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


या प्रकरणी मध्यस्थांच्या समितीला कोर्टाने 8 आठवड्यांची मुदत दिली आहे. अयोध्या प्रश्नाचा निकाल निवडणुकांच्या नंतरच येऊ शकतो आणि हा प्रश्न कोर्टात असल्याने निवडणुकांमध्ये या प्रश्नाचा राजकीय वापरही होऊ शकत नाही. त्यामुळेच हा निकाल म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रकार आहे, असं सलमान खुर्शीद म्हणाले.


भाजपशी युती करण्याआधी शिवसेनेने राम मंदिर प्रकरणी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. पण यावर आम्ही अध्यादेश काढणार नाही,असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अध्यादेश काढणार नाही, असंही ते म्हणाले होते.

Loading...


राम जन्मभूमीचा वाद हा फक्त जमिनीचा वाद नाही तर तो अनेकांच्या मनांशी जोडलेला आहे, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश या प्रश्नाकडे मानवतेच्या भावनेने बघतात ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, असं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.


या वादावर तोडगा काढण्यासाठी कोर्टाने निवृत्त न्यायमूर्ती एफ. एम. खलिफुल्ला, अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पंचू यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली आहे.


श्री. श्री. रविशंकर हे राम मंदिराच्या उभारणीसाठी अनुकूल असल्याने त्यांच्या नियुक्तीवर टीका होतेय. पण सुप्रीम कोर्टाने या मध्यस्थांची नेमणूक काळजीपूर्वक केली आहे आणि ते त्यांची जबाबादारी निभावतील, असा विश्वासही खुर्शीद यांनी व्यक्त केला.


हिंदू आणि मुस्लीम समुदायातील सगळ्याच व्यक्तींनी या प्रकरणी मतं नोंदवण्याची घाई करू नये, कोर्टाने नेमलेले मध्यस्थ यावर तोडगा काढतील, असंही सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.


==========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...