सलमानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, आजची रात्र जेलमध्येच!

सलमानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, आजची रात्र जेलमध्येच!

अभिनेता सलमान खाननला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या वकिलांनी लगेच जामीनासाठी अर्ज केला. उद्या सेशन्स कोर्टात सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल.

  • Share this:

जयपूर,05 एप्रिल : अभिनेता सलमान खाननला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या वकिलांनी लगेच जामीनासाठी अर्ज केला. उद्या सेशन्स कोर्टात सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. कोर्टानं सलमानला जामीन दिला तर कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सलमानची जेलमधून सुटका होईल. मात्र आजची रात्र त्याला जेलमध्येच काढावी लागणार आहे. सलमानला जोधपूरच्या जेलमधल्या बॅरक क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. जोधपूरच्या जेलमध्येच बलात्कराचा आरोपी आसारामबापूलाही ठेवण्यात आलाय.

 

First published: April 5, 2018, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading