S M L

'बिग बॉस' झाला सोशल मीडियावर ट्रोल

पण एकीकडे कोर्टात निकाल वाचला जात होता,तसतसा सोशल मीडियावर चर्चेला ऊत येत होता. कोणी सलमानची बाजू घेत होतं कोणी टीका करत होतं तर कुणी खिल्लीही उडवत होतं.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 5, 2018 03:28 PM IST

'बिग बॉस' झाला सोशल मीडियावर ट्रोल

04 एप्रिल :  बिग बॉस  सलमान खानला आज काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा झाली. पण  एकीकडे कोर्टात निकाल वाचला जात होता,तसतसा सोशल मीडियावर चर्चेला ऊत येत होता. कोणी सलमानची बाजू घेत होतं कोणी टीका करत होतं तर कुणी खिल्लीही उडवत होतं.

काळवीट 15 वर्ष जगतं पण सलमानची केस 20 वर्ष चालली असं कुणी म्हणालं. तर शिक्षेवरून काळवीटाची अनेक व्यंगचित्र प्रसिद्ध झाली. यात एका चित्रात काळवीट ये तो सच है की भगवान है असं गाणं गाताना दिसंतय. कोणी सलमानला पाहून स्वत:च काळवीट मेला असं म्हटलं तर कोणी   काळवीटाने आत्महत्या केली असं  म्हटलं . एकंदर काय तर सलमान प्रचंड ट्रोल झाला. या साऱ्यावर एक नजर टाकूया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2018 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close