Home /News /national /

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी, काय प्रकरण?

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी, काय प्रकरण?

निओलॅक्टाला (Neolacta) नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांच्या 'नारीक्षारा' (आईचे दूध) उत्पादनासाठी आयुष परवाना मिळाला. आईचे दूध नफ्यासाठी विकणारी ही आशियातील पहिली कंपनी आहे.

    नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं दूध मिळत आहे. होय तुम्ही बरोबर वाचलत. बंगलोरस्थित कंपनी निओलॅक्टा लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड (Neolacta Lifesciences Pvt Ltd.) आईचे दूध (Breast Milk) विकते. आईचे दूध नफ्यासाठी विकणारी ही आशियातील पहिली कंपनी आहे. आता ती वादात सापडली आहे. आईच्या दुधाच्या विक्रीला नियमानुसार परवानगी नसल्याचे सांगत अनेक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अन्न नियामक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने कंपनीचा परवाना रद्द केला आहे. FSSAI च्या कर्नाटक कार्यालयातून परवाना प्राप्त झाला FSSAI तपासणीत असे दिसून आले की कंपनीला नोव्हेंबर 2021 मध्ये 'नारीक्षरा' (आईचे दूध) उत्पादनासाठी आयुष परवाना मिळाला आहे. TOI च्या बातमीनुसार, Neolacta Lifesciences Private Limited ची स्थापना 2016 मध्ये झाली. कंपनीने FSSAI च्या कर्नाटक कार्यालयाकडून डेअरी उत्पादन श्रेणीमध्ये परवाना घेतली होती. ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (BPNI) च्या नुपूर बिर्ला म्हणतात, “एखाद्या कंपनीला मातांकडून दूध गोळा करून ते दुग्धजन्य पदार्थ म्हणून विकण्याची परवानगी दिली जात आहे हे अत्यंत धक्कादायक आहे.” कंपनीच्या एमडींनी ही गोष्ट सांगितली निओलॅक्टाचे एमडी सौरभ अग्रवाल म्हणाले की, ऑस्ट्रेलियात पहिली मिल्क बँक स्थापन करण्यासाठी कंपनीला मानवी दूध तंत्रज्ञानाचा पुरवठा करण्याचा अनुभव आहे. ते म्हणाले की, निओलॅक्टाने गेल्या पाच वर्षांत 450 रुग्णालयांमध्ये 51 हजारांहून अधिक मुदतपूर्व बाळांना लाभ दिला आहे. विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, तिने सोबत यायला नकार दिल्यावर त्याने... दान केलेले आईचे दूध प्रामुख्याने प्री-मॅच्युअर किंवा आजारी बाळांना प्यायला देण्यासाठी वापरले जाते. साधारणपणे, ना-नफा म्हणून स्थापन केलेल्या मिल्क बँकांमधून दूध खरेदी केले जाते. देणगीदारांकडून संकलित केलेले दूध पाश्चराइज्ड केले जाते, पोषक घटकांची चाचणी केली जाते आणि गोठवले जाते आणि संरक्षित केले जाते. सरकारी रुग्णालयांशी संलग्न असलेल्या दूध बँकांमध्ये मिळणारे दूध गरजूंना मोफत दिले जाते. निओलॅक्टाची किंमत? निओलॅक्टा 300 मिली फ्रोझन आईच्या दुधासाठी 4,500 रुपये आकारते. प्री-टर्म बाळाला दररोज सुमारे 30 मिली दुधाची आवश्यकता असू शकते तर सामान्य बाळाला दररोज 150 मिलीपर्यंत दुधाची आवश्यकता असू शकते. Neolacta मानवी दुधाची पावडर देखील विकते, जी कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर ई-कॉमर्स वेबसाइट्सशिवाय उपलब्ध आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या