साक्षी महाराज म्हणतात, "राम रहीम साधा माणूस, न्यायालयं इमामांवर का बोलत नाही?"

साक्षी महाराज म्हणतात,

"राम रहीम हा साधा माणूस आहे, त्याच्यावर लावलेले आरोप हे त्याच्या करोडो समर्थकांवर लावले आहे, मग समर्थक चुकीचे आहे का ?"

  • Share this:

26 आॅगस्ट : नेहमी या ना त्या विधानामुळे वाद ओढवणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची पाठराखण केलीये. राम रहीम हा साधा माणूस आहे, त्याच्यावर लावलेले आरोप हे त्याच्या करोडो समर्थकांवर लावले आहे, मग समर्थक चुकीचे आहे का ? असा अजब सवालच साक्षी महाराजांनी उपस्थितीत केलाय.

साक्षी महाराज एवढ्यावरच थांबले नाही. तर त्यांनी थेट न्यायालयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय हे जामा मश्जिदीच्या इमामांवर का कारवाई करत नाही, ते काय तुमचे नातेवाईक आहे का ? असं वक्तव्यही त्यांनी केलं.

गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलंय. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राम रहीमच्या समर्थकांनी पंचकूला परिसरात हैदोस घातला होता. या हिंसाराचारात 33 जणांचा मृत्यू झालाय तर 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे.

First published: August 26, 2017, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading