Delhi: Badminton Player Saina Nehwal joins BJP in the presence of Party's National General Secretary Arun Singh pic.twitter.com/uXPSJmDVcn
— ANI (@ANI) January 29, 2020
2015मध्ये ठरली होती नंबर-1 बॅडमिंटनपटू हैदराबादमध्ये राहून बॅडमिंटन जगात मोठे नाव कमावणाऱ्या सायना नेहवालचा जन्म 1 मार्च 1990 रोजी हरियाणामधील हिसार येथे झाला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 23 मे 2015 रोजी ती जगातील प्रथम क्रमांकावर आली होती. पहिल्या क्रमाकांवर येणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती सायनाकडे 22 सुपर सिरीज आणि ग्रँड प्रिक्सचे जेतेपद आहेत. याव्यतिरिक्त, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. सायना नेहवालवर बायोपिक राजकारणात प्रवेश करणाऱ्या बॅडमिंटन आयकॉन सायना नेहवालवरदेखील बायोपिक तयार करण्यात येत आहे. परिणीती चोप्रा या सिनेमात सायनाच्या प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. ‘सायना’ या नावाने बनवल्या जाणाऱ्या या बायोपिकचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचे म्हणणे आहे की, चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीमध्ये पूर्ण होईल.Delhi: Badminton Player Saina Nehwal to join BJP shortly pic.twitter.com/g5lbTf09v5
— ANI (@ANI) January 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.