हैदराबादी पठ्ठ्याची कमाल, ज्वालामुखीच्या तोंडावर फडकवला तिरंगा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 30, 2017 04:45 PM IST

हैदराबादी पठ्ठ्याची कमाल, ज्वालामुखीच्या तोंडावर फडकवला तिरंगा

30 मे : प्रत्येकाला आपण आपल्या आयुष्यात काहीतरी धाडसी करावं असं वाटत असतं पण प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. हैदराबादचा 25 वर्षाचा साई तेजा मात्र याला अपवाद आहे. कारण या पठ्ठ्यानं जे धाडस करायला घेतलंय ते जीवघेणंही होऊ शकतं. त्याने चक्क ज्वालामुखीच्या तोंडावर भारताचा तिरंगा फडकावण्याचं धाडस केलं आहे.

अलिकडेच साई इंडोनेशियाला एका ट्रिपसाठी गेला होता. तिथे त्यानं ड्युकोनो नावाच्या ज्वालामुखीवर जाऊन सेल्फी व्हिडिओ काढला आहे. खरं तर या ज्वालामुखीबाबत फार शास्त्रीय माहिती उपलब्ध नाहीये, तरीही इंडोनेशियातल्या एका दुर्गम भागात जाऊन साईनं हा सेल्फी शूट करण्याचं धाडस केलं आहे.

आता ज्वालामुखी म्हटल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात राख आलीच. याच राखेचे इथे अनेक डोंगरही तयार होतात. पण ही राख मजबूत असते असं नाही, काही ठिकाणी ही राख भुसभुशीतही असते. अशा राखेजवळ उभं राहून त्याने सेल्फी काढायचं धाडस केलं आहे. विचार करा, जर त्याचा पाय घसरून तो पडला असता तर त्यात त्याचा जीवही गेला असता. अशा परिस्थितीतही या हिरोने हिरोपंती करत दाखवलेल्या धाडसाची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली नाही तर नवलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2017 04:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...