• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भयंकर! आधी जबर मारहाणीने अर्धमेलं केलं आणि नंतर अंगावर ठेवला पेटता गॅस; पुजाऱ्याने पत्नीची केली निर्दयी हत्या

भयंकर! आधी जबर मारहाणीने अर्धमेलं केलं आणि नंतर अंगावर ठेवला पेटता गॅस; पुजाऱ्याने पत्नीची केली निर्दयी हत्या

धक्कादायक म्हणजे जेव्हा ती अर्धमेली झाली तेव्हा पुजाऱ्यानं गॅस शेगडी पेटवली आणि ती पत्नीच्या अंगावर ठेवली. खोलीतून आग निघत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली.

 • Share this:
  बालोदाबाजार, 21 सप्टेंबर : चारित्र्याच्या संशयावरून एका साई मंदिरातील पुजाऱ्याने पत्नीची निर्दयीपणे (wife murder) हत्या केली. हा पुजारी दिवसभर पत्नीशी भांडत होत आणि तिला मारहाणही करत होता. त्यानंतर पुन्हा रात्री घरी आल्यावर पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. धक्कादायक म्हणजे जेव्हा ती अर्धमेली झाली तेव्हा पुजाऱ्यानं (sai mandir priest killed wife) गॅस शेगडी पेटवली आणि ती पत्नीच्या अंगावर ठेवली. खोलीतून आग निघत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. छत्तीसगडच्या बालोदाबाजार येथे बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. शेजारील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला ताब्यात घेतले आहे. एफएसएल टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. हे प्रकरण भाटापारा पोलीस स्थानक परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदरच्या कोटमी गावात राहणारा रामनारायण पांडे (35) हे सिद्ध बाबा गावातील साई मंदिरातील पुजारी आहे. तो पत्नी मंदाकिनी पांडे (25), त्याची दोन मुले आणि मेहुणा रामायण तिवारी (17) आणि मेहुणी पूजा तिवारी (15) मंदिर परिसरातच मागील बाजूस बांधलेल्या घरात राहतो. रामनारायण पांडे आणि त्याच्या पत्नीमध्ये बुधवारी सकाळपासून वाद सुरू होता. रामनारायण तिला खूप मारहाण करत होता. हाती सापडेल त्यानं मारहाण केली रामनारायणचा पारा चांगला चढला होता. भांडणावेळी त्याच्या हातात जे सापडेल त्याने तो पत्नीला मारहाण करत होता. त्यानंतर तो दुपारी घरातून निघून गेला. रात्री तो परतल्यावर त्याने पत्नीला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला. पत्नीला इतका मार लागला की ती अर्धवट ग्लानीत बेडवर पडली. यानंतर, रामनारायणने स्वयंपाकघरात ठेवलेला गॅस स्टोव्ह पेटवला आणि पत्नी मंदाकिनीच्या अंगावर वारंवार ठेवला. हे वाचा - राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसांची 1500 पानांची चार्जशीट; शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 जणांची साक्षही सामील मेहुण्यांसमोर पत्नीची हत्या केली वारंवार गॅस शेगडी अंगावर आणून ठेवल्याने मंदाकिनीचे कपडे आणि अंथरूणाला आग लागली. खोलीतून आग निघत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस चौकीचे प्रभारी रोशन सिंह राजपूत यांनी सांगितले की, चौकशी दरम्यान असे आढळून आले आहे की, रामनारायण आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संपूर्ण घटनेवेळी त्याचा मेहुणा आणि मेहुणीही उपस्थित होते. त्यांचीही चौकशी करावी लागेल. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: