सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर प्रकरण : आज निकाल येण्याची शक्यता

भाजपचे विद्यमान अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह आणि गुजरातच्या तत्कालीन वरिष्ठ अधिका-यांच्या इशा-यावरूनच या बनावट चकमकी करण्यात आल्या असल्याचा आरोप होता.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 09:14 AM IST

सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर प्रकरण : आज निकाल येण्याची शक्यता

गांधीनगर, 21 डिसेंबर : गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय कोर्ट आज निकाल देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कोणाला शिक्षा होणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

भाजपचे विद्यमान अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह आणि गुजरातच्या तत्कालीन वरिष्ठ अधिका-यांच्या इशा-यावरूनच या बनावट चकमकी करण्यात आल्या असल्याचा आरोप होता. मात्र 2014 साली शाह यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस जे शर्मा यांनी याप्रकरणी आपण 21 डिसेंबरपर्यंत निकालपत्र पूर्ण करू आणि उशीरात उशीरा म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत अंतिम निकाल देऊ, असं म्हटलं होतं. सोहराबुद्दीन शेख आणि त्यांची पत्नी कौसर बी यांची 2005 मध्ये तर तुलसीराम प्रजापती याची 2006 मध्ये बनावट चकमकीत हत्या करण्यात आली.

या प्रकरणात एकूण 38 आरोपी होते, यातील 16 जणांची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे आता उर्वरित आरोपींबाबत न्यायालयाकडून काय निर्णय देण्यात येतो, हे पाहावं लागेल.


Loading...

बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझ्या नवऱ्याला मारलं, आता माझाही खून करा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...