Elec-widget

वादग्रस्त साध्वी प्रज्ञा संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर; काँग्रेस म्हणतं, गोडसे भक्तांना अच्छे दिन!

वादग्रस्त साध्वी प्रज्ञा संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर; काँग्रेस म्हणतं, गोडसे भक्तांना अच्छे दिन!

साध्वी प्रज्ञा यांना मुंबई उच्च न्यायालयाने 2017मध्ये आरोग्याच्या कारणांवरून जामीन दिला होता. त्याचबरोबर NIA ने त्यांच्या विरुद्ध MCOCAनुसार लावलेले आरोप हटवले होते.

  • Share this:

नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : आपल्या वक्तव्यांनी कायम वाद निर्माण करणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्या नियुक्तीमुळे पुन्हा वाद निर्माण झालाय. साध्वी प्रज्ञा यांची रक्षा मंत्रालयाच्या (Defence Ministry) संसदीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलीय. संरक्षण मंत्री अध्यक्ष असलेल्या या समितीत 21 जण सदस्य आहेत. काँग्रेसने साध्वीच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतलाय तर भाजपने या नियुक्तीचा बचाव केलाय. साध्वी प्रज्ञा या भोपाळच्या खासदार असून त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजयसिंग यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर टीका करताना म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा कायम उल्लेख करतात आणि वादग्रस्त असलेल्या साध्वीची संरक्षण सल्लागार समितीवर नियुक्ती केली जाते हा भाजपचा दुटप्पीपणा आहे.

तर काँग्रेसचे दुसरे नेते जयवीर शेरगील यांनीही ट्विटरवरून काँग्रेसवर निशाणा साधलाय. भाजपने राष्ट्रवादीचं नवं मॉडेल तयार केलंय. ज्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप आहे अशा लोकांना खासदार केलं आणि आता संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नियुक्तीही केलीय. त्यामुळेच गोडसे भक्तांना अच्छे दिन आले आहेत असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Loading...

तर भाजपने या नियुक्तीचा बचाव केलाय. भाजपचे राज्यसभा खासदार लेफ्टिनेंट जनरल डीपी वत्स यांनी म्हटलंय की, साध्वी प्रज्ञा या लोकसभेच्या खासदार आहेत. त्यांची कुठल्याही समितीवर नियुक्ती होऊ शकते. त्यात चुकीचं असं काहीच नाही. काँग्रेसला अशा प्रकारचे आरोप करण्याची सवयच आहे.

साध्वी प्रज्ञा यांना मुंबई उच्च न्यायालयाने 2017मध्ये आरोग्याच्या कारणांवरून जामीन दिला होता. त्याचबरोबर NIA ने त्यांच्या विरुद्ध MCOCAनुसार लावलेले आरोप हटवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 02:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com