मुंबई, 19 एप्रिल : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका सभेत बोलताना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. माजी IPS अधिकारी मीरां चड्ढा बोरवणकर यांनी हे वक्तव्य ऐकून धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
साध्वी प्रज्ञा यांना भाजपने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं.
News18शी बोलताना मीरां चड्ढा बोरवणकर म्हणाल्या, " प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य ऐकून मला प्रचंड धक्का बसला आहे. मी करकरे यांना 20 वर्षांहून अधिक काळ ओळखत होते. ते खरोखर सज्जन व्यक्ती होते आणि पोलीसदलात त्यांनी अत्यंत दक्ष अधिकारी म्हणून शेवटपर्यंत कामगिरी बजावली. आता फक्त ते स्वतःची बाजू मांडायला आपल्यात नाहीत, म्हणून प्रज्ञा ठाकूर त्यांच्या नावाचा असा वापर करत असतील तर ते अत्यंत गैर आहे. भारतीय संस्कृती ज्याबद्दल ही महिला आपला विश्वास असल्याचं सांगते त्याच्या विरोधात आहे हे आणि अनैतिकसुद्धा आहे. मी या वक्तव्याचा तीव्र निषेध करते. प्रज्ञा ठाकूर यांनी जाहीरपणे या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे."
हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारलं, तेव्हा माझं सूतक संपलं, असं धक्कादायक विधान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं होतं. "मालेगाव बाँबस्फोट प्रकऱणी तपास करताना, त्यांनी माझा छळ केला. तेव्हाच मी त्यांचा सर्वनाश होईल असा शाप दिला होता", असंही त्या म्हणाल्या.
26/11 चा गुन्हेगार अजमल कसाबला पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. या प्रक्रियेत तत्कालीन IPS अधिकारी मीरां चड्ढा बोरवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या वेळी महाराष्ट्राच्या कारागृह विभागाच्या प्रमुख म्हणून मीरां चड्ढा बोरवणकर काम बघत होत्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा प्रज्ञासिंह ठाकूरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
Disgraceful comments by BJP's Bhopal Lok Sabha candidate Pragya Thakur on 26/11 martyr Hemant Karkare ji need to be condemned in strongest terms. BJP is showing its true colours & it must be shown it's place now https://t.co/3Qdo1x7kPI
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 19, 2019
"ज्या दिवशी त्यांनी मला पकडलं सूतक लागलं होतं आणि बरोबर सव्वा महिन्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना मारलं. माझं सूतक संपलं", असं साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.
काय म्हणाल्या प्रज्ञासिंह?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा