हेमंत करकरे आणि गोडसेबद्दलचं वक्तव्य, साध्वी प्रज्ञा स्वत:लाच करणार शिक्षा

लेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे खरे देशभक्त होते, असं वक्तव्य केलं.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 02:31 PM IST

हेमंत करकरे आणि गोडसेबद्दलचं वक्तव्य, साध्वी प्रज्ञा स्वत:लाच करणार शिक्षा

भोपाळ, 20 मे : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे खरे देशभक्त होते, असं वक्तव्य केलं. त्यानंतर साध्वींवर सर्व थरांतून टीका झाली. या वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञा यांनी त्यानंतर माफीदेखील मागितली आहे. आता आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत साध्वी यांनी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं आहे.

'निवडणूक प्रक्रियेनंतर आता चिंतन आणि मनन करण्याची वेळ आली आहे. या काळात माझ्या बोलण्यामुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते आणि प्रायश्चित्त करण्यासाठी दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या करत आहे,' असं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे.

साध्वींचं वादग्रस्त वक्तव्य आणि मोदींची प्रतिक्रिया

या सगळ्या प्रकाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी उघडपणे बोलले आहेत. प्रचारसभेमध्ये एका स्थानिक न्यूज चॅनेलच्या पत्रकाराशी बोलताना त्यांनी साध्वींच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं ते सांगितलं. साध्वींच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं मोदींना विचारलं असता ते म्हणाले, "हे वक्तव्य घृणास्पद आहे. कुठल्याही सभ्य समाजात अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाऊ शकत नाहीत. गांधीजींबद्दल असं काही बोलणं निषेधार्थच आहे. साध्वी प्रज्ञा यांनी झाल्या प्रकारची माफी मागितली हे खरं. पण मी मनापासून त्यांना माफ करू शकणार नाही."

भाजपनेसुद्धा साध्वींचं हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक असल्याचं स्पष्ट करत हात झटकले. या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही, असं ट्वीट अमित शहा यांनीसुद्धा केलं.

Loading...

हेमंत करकरेंबाबत काय म्हणाल्या होत्या प्रज्ञासिंह ठाकूर?

बई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल भाजपच्या भोपाळमधील उमेदवारी साध्वी प्रज्ञासिंह यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर भाजपसह साध्वी प्रज्ञासिंहवर जोरदार टीका झाली.

‘हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असे साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना माझी सुटका करण्याची विनंती केली होती. साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, असे या पथकाने म्हटलं होते. पण आपल्याकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबदद्ल पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही', असे हेमंत करकरे म्हणाले होते, याची आठवण साध्वी यांनी करून दिली. तुरुंगामध्ये आपला अतोनात छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी याआधी केला होता.


VIDEO: निकालाआधी कांचन कुल यांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...