साध्वींचा मार्ग मोकळा झाल्याबरोबर भाजपच्या या खासदाराचा 'प्लॅन' बारगळला

साध्वींचा मार्ग मोकळा झाल्याबरोबर भाजपच्या या खासदाराचा 'प्लॅन' बारगळला

विद्यमान खासदाराला उमेदवारी अर्ज भरायला लावून भाजपने भोपाळचा प्लॅन बी तयार ठेवला होता, आता त्याची गरज नसल्यामुळे या विद्यमान खासदाराच्या मनसुब्यावर मात्र पाणी पडलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 24 एप्रिल : साध्वी प्रज्ञासिंह यांना निवडणूक लढवण्यासापासून रोखावं याकरता दाखल करण्यात आलेली याचिका NIA न्यायालयानं फेटाळून लावली आणि साध्वींचा मार्ग मोकळा झाला. त्याबरोबर भाजपने भोपाळमधून उभा केलेल्या डमी उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आहे. विद्यमान खासदाराला उमेदवारी अर्ज भरायला लावून भाजपने भोपाळचा प्लॅन बी तयार ठेवला होता, आता त्याची गरज नसल्यामुळे या विद्यमान खासदाराच्या मनसुब्यावर मात्र पाणी फेरलं गेलं आहे.

मध्य प्रदेशातली भोपाळची जागा भाजपचा गड आहे. पण यावर्षी भाजपने ती अस्मितेची लढाई केल्याने या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने दिग्विजय सिंहांसारखा तगडा उमेदवार भोपाळमधून दिल्यानंतर भाजपनेही ध्रुवीकरणाची संधी साधत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी घोषित केली.

साध्वी प्रज्ञा या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आरोपी आहेत आणि केस विशेष कोर्टात सुरू आहे. त्या जामीनावर सुटलेल्या आहेत. आता या कारणावरून साध्वी प्रज्ञा यांची उमेदवारी रद्द झाली तर आयत्या वेळी पक्षाची अडचण नको, म्हणून भोपाळचे विद्यमान आमदार आणि मध्य प्रदेशातले ज्येष्ठ नेते अलोक संजर यांना पक्षाने उमेदवारी अर्ज भरायला लावला होता.

आज कोर्टाने साध्वींच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याबरोबर संजर यांची उमेदवारी रद्द झाली आहे.

कोणी घेतला होता आक्षेप?

2008मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सैय्यद अहमन याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सैय्यदचे वडिल बिलाल निसार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत मुंबईच्या NIA कोर्टात साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली होती. पण ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यावर निर्णय देताना न्यायालयानं न्यायायलय देशातील कोणत्याही नागरिकाला निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. शिवाय, आरोपीला शिक्षा देखील झालेली नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं आता साध्वी प्रज्ञासिंह यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय होता प्लॅन B?

पक्षनेतृत्वाच्या आदेशावरून आपण भोपाळमधून उमेदवारी अर्ज भरला, असं आलोक संजर यांनी न्यूज 18 ला सांगितलं होतं. साध्वींची उमेदवारी रद्द होण्याची वेळ आली तर भाजपने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे, हेच यावरून दिसतं.

माझा पक्ष मला जो आदेश देतो त्याचं मी पालन करतो, असं आलोक संजर म्हणाले. पण साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द होईल, अशी शक्यता दिसत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मी भोपाळच्या जनतेसाठी चांगलं काम केलं आहे. माझ्यावर जबाबदारी दिली नाही तरीही मी इथल्या लोकांचं ऋण फेडेन, असंही आलोक संजर म्हणाले. माझ्यामुळे कोणी दु:खी होऊ नये, असं मला वाटतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

'गोमूत्रामुळे कॅन्सर बरा होतो'

साध्वी प्रज्ञासिंह या काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना, गोमूत्रामुळे कॅन्सर बरा होतो, असं विधान त्यांनी केलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.

गायीच्या पाठीवरून हात फिरवला की हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब बरा होतो, असंही विधान साध्वी यांनी केलं आहे.

ModiWithAkshay राजकारणापलीकडचे नरेंद्र दामोदरदास मोदी पाहा UNCUT मुलाखत

First published: April 24, 2019, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading