साध्वी प्रज्ञासिंह यांना तुरुंगात पाठवण्याची काँग्रेस सरकारची तयारी

भोपाळमधल्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा मध्य प्रदेशमधल्या कमलनाथ सरकारने साध्वींबद्दलचा एक खटला पुन्हा सुरू करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 04:45 PM IST

साध्वी प्रज्ञासिंह यांना तुरुंगात पाठवण्याची काँग्रेस सरकारची तयारी

भोपाळ, 21 मे : भोपाळमधल्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा मध्य प्रदेशमधल्या कमलनाथ सरकारने साध्वींबद्दलचा एक खटला पुन्हा सुरू करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणी 9 वर्षं तुरुंगात काढल्यानंतर तब्येतीच्या कारणांमुळे त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक सुनील जोशी याच्या हत्येप्रकरणीही साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर आरोप आहेत. हा खटला पुन्हा उघडला गेला तर साध्वी अडचणीत येऊ शकतात.

कोण आहे सुनील जोशी ?

सुनील जोशी हा एकेकाळी साध्वींचाच सहकारी होता.त्याची 29 डिसेंबर 2007 रोजी देवास औद्योगिक क्षेत्र पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करतानाच पोलीस साध्वी प्रज्ञासिंह आणि आणखी सात आरोपींपर्यंत पोहोचले.असं असलं तरी या सगळ्यांची पुराव्याअभावी 1 फेब्रुवारी 2017 ला सुटका झाली.

वादग्रस्त वक्तव्य

Loading...

साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणुकीच्या काळात, नथुराम गोडसे हे देशभक्त असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याआधी त्यांनी मुंबई हल्ल्यातले शहीद अधिकारी हेमंत करकरे यांना माझा शाप लागला,असंही वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यांवरून बरंच राजकारण झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचं समर्थनच केलं होतं. साध्वी प्रज्ञासिंह या काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.या लढतीचा काय निकाल लागतो ते 23 मे ला कळेल पण साध्वी जिंकल्या किंवा हरल्या तरी त्यांच्यावर या खटल्यांची टांगती तलवार राहणार, असंच चित्र आहे.

==============================================================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...