भाजपच्या वाचाळवीरांना अमित शहांनी भरला दम तर साध्वी म्हणतात....

भाजपच्या वाचाळवीरांना अमित शहांनी भरला दम तर साध्वी म्हणतात....

भाजपचे नवे खासदार गिरीराज सिंह यांना गृहमंत्री अमित शहांनी वादग्रस्त विधानांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यावर गिरीराज सिंह यांनी एक टिप्पणी केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जून : भाजपचे नवे खासदार गिरीराज सिंह यांना गृहमंत्री अमित शहांनी वादग्रस्त विधानांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. गिरीराज सिंह हे बिहारमधल्या बेगुसरायमधून नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत.

अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना फोन केला आणि वादग्रस्त विधानं न करण्याची खबरदारी घ्यायला सांगितलं. गिरीराज सिंह यांना आता मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे.

इफ्तार पार्टी आणि नवरात्र

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये राम विलास पासवान, नितिशकुमार, सुशील मोदी असे नेते सहभागी झाले होते. यावर गिरीराज सिंह यांनी एक टिप्पणी केली.

इफ्तार पार्टीसारखंच नवरात्रीचं आयोजन केलं असतं तर असेच सुंदर सुंदर फोटो आले असते... असं म्हणत त्यांनी या नेत्यांवर टीका केली. त्यावर अमित शहा यांनी त्यांना वादग्रस्त विधानं न करण्याबद्दल सुनावलं.

साध्वींचं नोटिशीला उत्तर

भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनाही त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल भाजपच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यावर आता मी शिस्तीचं पालन करेन, असं साध्वींनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत साध्वींनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांनी नथुराम गोडसेंना देशभक्त म्हटलं होतं. त्याचबरोबर हेमंत करकरेंना माझा शाप भोवला, असंही साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या होत्या.

पंतप्रधानांशी करणार चर्चा

या वाक्यांवरून साध्वी प्रज्ञासिंह यांना नोटीस पाठवण्यात आली. मी शिस्तपालन समितीला याचं उत्तर दिलं आहे आणि योग्य वेळ आली की मी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही चर्चा करेन,असं साध्वींचं म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करत आहेत. सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच आहेत, असंही साध्वी म्हणाल्या. जनतेने विकासाला निवडल्यामुळेच मोदींचं सरकार पुन्हा आलं, असं प्रशस्तिपत्रही त्यांनी दिलं.

=================================================================================

VIDEO : आकाशवाणी आमदार निवासाच्या लिफ्टमध्ये अडकले आमदार, अशी करावी लागली सुटका

First Published: Jun 4, 2019 08:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading