'गोमूत्रामुळे बरा होतो कॅन्सर', साध्वी प्रज्ञासिंह यांचा नवा दावा

भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या साध्वी प्रज्ञासिंह या त्यांच्या एका दाव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. या विधानानंतर साध्वींनी मौन पाळलं होतं पण आणखी एक वादग्रस्त विधान करून त्यांनी त्यांचं मौन सोडलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 03:32 PM IST

'गोमूत्रामुळे बरा होतो कॅन्सर', साध्वी प्रज्ञासिंह यांचा नवा दावा

भोपाळ, 23 एप्रिल : भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या साध्वी प्रज्ञासिंह या त्यांच्या एका दाव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. नंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतलं. या विधानानंतर साध्वींनी मौन पाळलं होतं पण आणखी एक वादग्रस्त विधान करून त्यांनी त्यांचं मौन सोडलं आहे.

साध्वींनी हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब आणि कॅन्सरवर एक इलाज सांगितला आहे. गोमूत्र प्राशन केल्यामुळे हे आजार बरे होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

'गायीच्या पाठीवरून फिरवा हात'

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रज्ञासिंह यांनी असाच आणखी एक दावा केला आहे. गायीच्या पाठीवरून हात फिरवला की रक्तदाबाचा आजार बरा होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. गायीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तरी रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं, असंही त्यांचं म्हणणं आहे.

साध्वींनाही झाला होता कॅन्सर

Loading...

साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव स्फोटातल्या प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणी 9 वर्षं तुरुंगात राहिल्यानंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनाही कॅन्सर झाला होता आणि आपल्या कॅन्सरवरही आपणच इलाज केला, असंही सांगायला साध्वी विसरल्या नाहीत.

भिक्षा आणि समाजातून मदत

साध्वींनी सोमवारी 22 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच आपली संपत्तीही जाहीर केली. आपलं स्वत:चं असं काही उत्पन्न नाही, पण भिक्षा आणि समाजातून मिळणारी मदत यावरच माझा उदरनिर्वाह अवलंबून आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

या माध्यमातून आपल्याकडे 4 लाख 44 हजार 224 रुपयांची स्थायी आणि अस्थायी संपत्ती आहे, असंही त्यांनी जाहीर केलं. यामध्ये 2 लाख 54 हजार 400 रुपयांचे दागिनेही आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

================================================================================

VIDEO: मतदान केल्याचा पुरावा दाखवा, एकावर एक मिसळ फ्री मिळवा!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...