साध्वी प्रज्ञासिंह यांच्या बुरख्याबद्दलच्या वक्तव्याने नवा वाद, भाजप पुन्हा अडचणीत

देशाची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्यासाठी बुरख्यावर बंदी घालायला हवी, असं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे. मुस्लीमधर्मियांनी आपण ज्या देशात राहतो त्यानुसार परंपरांचं पालन करायला हवं, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 05:17 PM IST

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या बुरख्याबद्दलच्या वक्तव्याने नवा वाद, भाजप पुन्हा अडचणीत

भोपाळ, 1 मे : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' मध्ये बुरख्यावर बंदी घालण्याबद्दलचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या मताशी आपण सहमत आहोत, असं साध्वींनी म्हटलं आहे.

देशाची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्यासाठी बुरख्यावर बंदी घालायला हवी, असं साध्वी म्हणाल्या. मुस्लीमधर्मियांनी आपण ज्या देशात राहतो त्यानुसार परंपरांचं पालन करायला हवं, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. पहिलं प्राधान्य हे देशालाच द्यायला हवं, असंही त्या म्हणाल्या.

साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. याआधी त्यांनी मुंबई हल्ल्यातले शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल विधान करून वाद निर्माण केला होता. आता त्यात या वक्तव्याचीही भर पडली आहे.

एअरपोर्टवरची सुरक्षा तपासणी

एअरपोर्टवर जेव्हा सुरक्षा तपासणी होते तेव्हा मुस्लीम महिलांना बुरखा बाजूला करून सुरक्षा चाचणी द्यावी लागते. यामुळेच त्यांनी स्वत:हून बुरखा घालायचा की नाही याबद्दल विचार करावा, असं साध्वी म्हणाल्या. साध्वी प्रज्ञासिंह यांनी बुरख्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं आहे.

Loading...

साध्वींच्या वक्तव्याला विरोध

साध्वींच्या वक्तव्यावर भोपाळचे काझी मौलाना सय्यद मुश्ताक अली नडवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुरखा हे मुस्लीम महिलांच्या सन्मानाचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले.

तिहेरी तलाकचं समर्थन

साध्वी प्रज्ञासिंह यांनी तिहेरी तलाकवर बंदीच्या निर्णयाचंही समर्थन केलं. यामुळे अनेक महिलांना न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे महिलांचं शोषण थांबेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.

=============================================================

VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...