'हेमंत करकरे यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला', साध्वी प्रज्ञासिंह यांची मुक्ताफळं

'हेमंत करकरे यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला', साध्वी प्रज्ञासिंह यांची मुक्ताफळं

मध्य प्रदेशमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळहून उमेदवारी दिली आणि वाद सुरू झाला. त्यातच आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 19 एप्रिल : मध्य प्रदेशमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळहून उमेदवारी दिली आणि वाद सुरू झाला. त्यातच आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेतली.

हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असं साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना माझी सुटका करण्याची विनंती केली होती. साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, असं या पथकाने म्हटलं होतं पण आपल्याकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबदद्ल पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही, असं हेमंत करकरे म्हणाले होते याची आठवण साध्वी यांनी करून दिली.

तुरुंगामध्ये आपला अतोनात छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी याआधी केला होता.

मालेगाव बॉम्बस्फोट खटला

साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या प्रमुख आरोपी आहेत. तब्येतीच्या कारणामुळे आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. पण याच प्रकरणी त्या 9 वर्षं तुरुंगात होत्या. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा कसून तपास केला होता. त्यामुळेच साध्वींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रज्ञा ठाकूरांनी जाहीर माफी मागावी - मीरां चड्ढा बोरवणकर

दुचाकी साध्वी यांच्या नावावर

मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू ओढवला तर अनेक जण जखमी झाले होते. हा स्फोट हिंदुत्ववादी संघटनांनी घडवून आणला, असा संशय त्यांच्यावर होता. साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्यविरोधी कायद्यानुसार कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या स्फोटात वापरलेली दुचाकीदेखील साध्वींच्याच नावावर होती. त्यामुळे संशयाची सुई साध्वी यांच्यावर रोखली गेली होती.

साध्वींच्या वक्तव्याचा निषेध

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हेमंत करकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. भाजपने आपले खरे रंग दाखवले आहेत, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

=================================================================================================================================================================

हेमंत करकरेंबद्दल साध्वींचे धक्कादायक वक्तव्य, 'त्यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सुतक संपवलं' पाहा VIDEO

First published: April 19, 2019, 3:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading