साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात...

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात...

साध्वी प्रज्ञासिंह त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी महात्मा गांधींबद्दल वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे.

  • Share this:

भोपाळ, 21 ऑक्टोबर : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आता त्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपुत्र असं म्हटलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रपुत्र आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, असं साध्वी म्हणाल्या.

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त भाजपने 2 ऑक्टोबरपासून देशभरात गांधी संकल्प यात्रा काढली आहे पण साध्वी प्रज्ञासिंह यांनी आतापर्यंत या यात्रेत भाग घेतलेला नाही. भोपाळ रेल्वे स्टेशनवर साध्वी प्रज्ञासिंह यांना पत्रकारांनी विचारलं, तुम्ही संकल्प यात्रेमध्ये का जात नाही? त्यावर साध्वी म्हणाल्या, गांधी राष्ट्रपुत्र आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत पण मला कुणालाही स्पष्टीकरण द्यायचं नाही.

ज्यांचं कार्य प्रशंसनीय आहे ते निश्चितच आमच्यासाठी आदरणीय आहेत. आम्ही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच चालतो, असंही त्या म्हणाल्या.

(हेही वाचा : आरेमधल्या मेट्रो कारशेडला स्थगिती नाही पण सुप्रीम कोर्टाने विचारले हे सवाल)

साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकतंच एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी कस्तुरबा गांधींची प्रशंसा केली होती.लोकसभा निवडणुकीच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह यांनी, महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. यावरही मोठा वाद झाला. साध्वी प्रज्ञासिंह यांना मी मनापासून माफ करणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.

==============================================================================

मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

First published: October 21, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading