साधू वासवानी मिशनच्या दादा वासवानी यांचं 99व्या वर्षी निधन

साधू वासवानी मिशन चे प्रमुख दादा उर्फ जे पी वासवानी यांचं पुण्यात निधन झालं. ते 99 वर्षांचे होते अध्यात्म,सामाजिक,शैक्षणिक, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात त्यांनी प्रचंड मोठं काम केलं लालकृष्ण अडवाणी हे त्यांना स्वतःचे अाध्यात्मिक गुरू मानायचे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2018 11:19 AM IST

साधू वासवानी मिशनच्या दादा वासवानी यांचं 99व्या वर्षी निधन

पुणे, 12 जुलै : साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा उर्फ जे पी वासवानी यांचं पुण्यात निधन झालं. ते 99 वर्षांचे होते अध्यात्म,सामाजिक,शैक्षणिक, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात त्यांनी प्रचंड मोठं काम केलं लालकृष्ण अडवाणी हे त्यांना स्वतःचे अाध्यात्मिक गुरू मानायचे.  सतत हसतमुख असणारे दादा 99व्या वर्षीही कार्यरत होते. त्यांनी त्यांचे काका साधू वासवानी यांची  अाध्यात्मिक,सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली. पुण्यातील साधू वासवानी मिशनमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय त्यांनी अखेरपर्यंत शांतता, शाकाहार याचा पुरस्कार केला.

हेही वाचा

'भाजप निवडून आली तर भारत होईल हिंदू पाकिस्तान'

आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

फेडररच्या पदरी निराशा, 9व्या विम्बल्डन कपचे स्वप्न भंगले

Loading...

आयुष्यभर त्यांनी स्त्री समतेचा, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार गेला. अनेक दुर्धर आजारांवर त्यांनी मात करत ते 99 वर्ष जगले.

अनेक कलाकार, मंत्री मार्गदर्शनासाठी त्यांची भेट घ्यायचे. पंतप्रधान मोदी, दलाई लामा, आमिर खान, अण्णा हजारे अशा अनेक जणांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या निधनानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 11:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...