दाओसमधल्या WEF मध्ये सद्गुरू देणार ध्यानधारणेचे धडे

दाओसमधल्या WEF मध्ये सद्गुरू देणार ध्यानधारणेचे धडे

दाओसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WEF)उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा एका दशकानंतर इशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू अशाच आणखी एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. 'चॅम्पियन्स फॉर 1 ट्रिलियन ट्रीज' असं या उपक्रमाचं नाव आहे.

  • Share this:

दाओस, 20 जानेवारी : दाओसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WEF)उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा एका दशकानंतर इशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू अशाच आणखी एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. 'चॅम्पियन्स फॉर 1 ट्रिलियन ट्रीज' असं या उपक्रमाचं नाव आहे. हा उपक्रमही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचाच एक भाग आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद 21 ते 24 जानेवारी 2020 या काळात भरणार आहे. स्वित्झर्लंडमधल्या दाओसमध्ये होणाऱ्या या परिषदेत सद्गुरू सर्वांना ध्यानधारणेचे धडे देतील.

1 हजार अब्ज झाडं

1 ट्रिलियन ट्रीज हा मंच युनायटेड नेशन्स एनव्हायर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) आणि फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) या संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमांचा एक भाग आहे. या उपक्रमात, 2030 पर्यंत जगभरामध्ये एक हजार अब्ज झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या परिषदेत जगभरातले सगळ्यात प्रभावी नेते, बिझनेस लीडर्स, प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. वनांचा ऱ्हास आणि हवामान बदलाचं आव्हान या समस्यांना सामोरं जाण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्रांची भागिदारीला प्रोत्साहन देणं हे यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे.

(हेही वाचा : शिवसेनेपाठोपाठ भाजपचं आणखी एक ब्रेक अप, गमावला हा जुना मित्र)

रॅली फॉर रिव्हर्स

सद्गुरूंनीही भारतात अशाच प्रकारे पर्यावरण रक्षणाचे उपक्रम सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांतर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या उद्दिष्टांचाच ते एक भाग आहेत. यामध्येच 15 वर्षांत साडेतीन कोटी झाडं लावण्याच्या संकल्पाचा समावेश आहे. त्याचबरोबर भारतातल्या नद्या वाचवण्यासाठी 'रॅली फॉर रिव्हर्स' हा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. सद्गुरूंनी सुरू केलेल्या 'कावेरी कॉलिंग' या प्रकल्पामध्ये 5 कोटी शेतकऱ्यांना वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलं आहे. यामुळे पाणीटंचाईवर मात करता येईल. 'कावेरी कॉलिंग' या प्रकल्पाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2020 09:30 PM IST

ताज्या बातम्या