नोकरीवरून काढल्याचा राग; भारतीय बॉसला पाकिस्तानी कामगारानं चाकूनं भोसकलं

नोकरीवरून काढल्याचा राग; भारतीय बॉसला पाकिस्तानी कामगारानं चाकूनं भोसकलं

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पाकिस्तानी कामगारानं भारतीय बॉसला भोसकलं आहे.

  • Share this:

लंडन, 12 मे : लंडनमध्ये पाकिस्तानी कामगारानं भारतीय बॉसला भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामावरून काढल्याचा राग मनात ठेवून बॉसवर चाकू हल्ला करण्यात आला. नदीम उद्दीन हमीद मोहम्मद असं ( वय 24 ) असं भारतीय बॉसचं नाव आहे. तर, अकीब परवेज ( वय 26 ) असं या कामागाराचं नाव आहे. यामध्ये नदीम उद्दीन हमीद मोहम्मदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नदीमच्या पाश्चात आई – वडील आणि 7 महिन्यांची गरोदर पत्नी आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर अकीब परवेजवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टानं त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण


नदीम मुळचा भारतीय

नदीम उद्दीन हमीद मोहम्मद हा मुळचा हैद्राबादमधील रहिवासी आहे. साधारण वर्षभरापूर्वीच नदीमचं लग्न झालं होतं. तर, महिन्याभरापूर्वीच नदीमची पत्नी अफ्सा लंडनमधील नदीमच्या घरी राहायाला आली होती. बुधवारी दुपारी 12.32 वाजता वेलिंगटनमधील टेस्को येथील कार पार्किंगमध्ये नदीम उद्दीन हमीद मोहम्मद वर चाकू हल्ला करण्यात आला. अकीब परवेजचं काम चांगलं नव्हतं. म्हणून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. अकीब परवेजचा रिपोर्टींग बॉस नदीम होता. आपली नोकरी जाण्यामागे नदीम कारणीभूत असल्याचा राग मनात ठेवत अकीब परवेजनं नदीमवर जीवघेणा हल्ला केला.


नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शबाना आझमी देश सोडणार? काय आहे सत्य?


पोलीस तपास जारी

दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. अकीब परवेजविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती लंडन पोलिसांनी दिली. अकीब परवेजनं हल्ला एकट्यानं केला नसून त्यामध्ये आणखी एकाचा सहभाग असण्याची शक्यता डिटेक्टीव्हन व्यक्त केली आहे.

नदीम हा एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच्या हाताखाली अकीब परवेज होता. पण, अकीब परवेजला कामात गती नव्हती. म्हणून त्याला कामवरून काढण्यात आलं होतं. शवविच्छेदनानंतर नदीमचा भोसकून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.


VIDEO : राजधानी दिल्लीत चुरशीची लढत, मुख्यमंत्री केजरीवाल मतदानानंतर म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: murder
First Published: May 12, 2019 03:49 PM IST

ताज्या बातम्या