नवी दिल्ली, 18 मार्च : मुंबईत कारमध्ये स्फोटकं सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी भाजपने (BJP) आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेनेच्या (Shivsena) दोन नेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.
राजधानी दिल्लीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील भाजपचे नेते आणि खासदार उपस्थितीत होते. या भेटीच्या वेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी एनआआए मार्फत करण्यासंदर्भात मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीएम किसान योजनेंतर्गत सरकारनं केली मोठी घोषणा
या भेटीनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची वेगळी बैठक झाली. सचिन वझे प्रकरणात समाविष्ट असलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्या विरुद्ध केंद्र सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, बुधवारी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं नाव घेत सचिन वाझे याच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. 'वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचं नाव आलं होतं. अशा स्थितीतही मी मुख्यमंत्रिपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत बोलले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता,' असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत
'शिवसेनेसोबत सचिन वाझे याचे अतिशय जवळेचे संबंध होते. एवढंच नाही तर अनेक नेत्यांसोबत त्याचे व्यवसायिक संबंध होते. हे सर्व सचिन वाझे एकटा करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत काही जण आहेत. हे एका पोलीस अधिकाऱ्याचं काम नाही, तर सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav thacakrey, अमित शहा