अखेर सचिन तेंडुलकरची राज्यसभेत हजेरी

अखेर सचिन तेंडुलकरची राज्यसभेत हजेरी

मंगळवारी समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सचिन आणि रेखाला लक्ष्य केलं होतं. या दोघांची उपस्थिती कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेतून निलंबित करावं अशी मागणीही केली होती

  • Share this:

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट: ज्याला क्रिकेटचा परमेश्वर मानलं जातं त्या खासदार सचिन तेंडुलकरने बऱ्याच दिवसांनंतर राज्यसभेत हजेरी लावली आहे. प्रश्नोत्तरांच्या तासात मात्र त्याने कुठलाही प्रश्न विचारला नाही. तसंच बॉक्सिंग खेळाडू मेरी कॉमही संसदेत उपस्थित होत्या.

मंगळवारी समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सचिन आणि रेखाला लक्ष्य केलं होतं. या दोघांची उपस्थिती कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेतून निलंबित करावं अशी मागणीही केली होती. त्यानंतर सचिनने लगेच राज्यसभा गाठली.

२०१२ पासून सचिन तेंडुलकर राज्यसभेचा सदस्य आहे. आतापर्यंत ३४८ दिवसांच्या कामकाजापैकी फक्त २३ दिवस सचिन सभागृहात हजर राहिला आहे, तर रेखा फक्त १८ दिवस राज्यसभेत उपस्थित होत्या. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 09:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading