सचिन तेंडुलकरने राज्यसभेचा संपूर्ण पगार पंतप्रधान मदतनिधीला केला दान

सचिन तेंडुलकरने राज्यसभेचा संपूर्ण पगार पंतप्रधान मदतनिधीला केला दान

सचिनला पगार आणि इतर मासिक भत्ते मिळून ९० लाख रुपये मिळाले होते. सचिनने हे सर्व पैसे पंतप्रधान निधीमध्ये जमा केले.

  • Share this:

मुंबई, 02 एप्रिल : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा दिलदारपणा सर्वश्रूत आहे. आता राजकीय मैदानावर निवृत्त होत असताना सचिनने आपल्या याच कार्याची छाप सोडलीये.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राज्यसभेतून निवृत्त होताना राजकारण्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. खासदारकीसाठी मिळणारा पगार आणि भत्ते सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मदतनिधीला दान केले आहेत.

सचिन तेंडुलकर नुकताच राज्यसभेतून निवृत्त झाला. यावेळी त्याला पगार आणि इतर मासिक भत्ते मिळून ९० लाख रुपये मिळाले होते. सचिनने हे सर्व पैसे पंतप्रधान निधीमध्ये जमा केले.

सचिन तेंडुलकरने केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने पत्र जारी करत त्याचे आभार मानले आहेत. संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हा निधी उपयोगी ठरेल', असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2018 12:12 PM IST

ताज्या बातम्या