Eco-Friendly Ganesha 2018: सचिन तेंडुलकरने चाहत्यांकडे केली एक खास विनंती

मी माझ्या आईला आणि पुजारींना याबद्दल विचारले. त्यांनीही माझ्या निर्णयाला संमती दिली

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2018 02:28 PM IST

Eco-Friendly Ganesha 2018: सचिन तेंडुलकरने चाहत्यांकडे केली एक खास विनंती

मुंबई, १७ सप्टेंबर- संपूर्ण देशात गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. एकीकडे महाराष्ट्रातील प्लॅस्टिक बंदीमुळे थर्माकॉलवर निर्बंध आली आहेत तर दुसरीकडे अनेक पर्यावरणप्रेमी गणपतींच्या मुर्तीचे इको- फ्रेण्डली पद्धतीने विसर्जन करण्याची विनंती करत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या विनंतीला मान देऊन यंदा त्याच्या गणपतीचे विसर्जन इको- फ्रेण्डली पद्धतीने केले.

सचिनकडे दरवर्षी दीड दिवसांचा गणपती येतो. यावर्षी सचिनने घरातच एका टबमध्ये मूर्तीचे विसर्जन केले. आपल्या या कृतीबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, ‘मरिन ड्राइव्हवरून गाडीतून जात असताना मला समुद्रातून रस्त्यावर फेकला गेलेला कचरा दिसला. हा कचरा आपणच समुद्रात टाकलेला असतो. ही गोष्ट मला अजिबात आवडली. कुठेतरी मनात ही गोष्ट सतत येत होती. म्हणून यावर्षी मी एक निर्णय घेतला. यंदा गणपतीचे विसर्जन घरीच करायचे. पण हा एक फार मोठा निर्णय होता. म्हणून मी माझ्या आईला आणि पुजारींना याबद्दल विचारले. त्यांनीही माझ्या निर्णयाला संमती दिली. अखेर आम्ही घरीच गणपती विसर्जन केले.’

Loading...

पुढे सचिन म्हणाला की, ‘मी सर्वांना विनंती करतो की त्यांनीही शक्य असेल तर घरात किंवा घराच्या परिसरात कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन करा. शेवटी एवढंच सांगेन की, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’ सचिनने त्यात्या चाहत्यांना इको- फ्रेण्डली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तुम्हीही जर इको- फ्रेण्डली पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला असेल तर आम्हाला नक्की सांगा.

भाजप खासदाराचे पाय धुऊन कार्यकर्त्यांनी प्यायले पाणी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...