बंडानंतर सचिन पायलट सोडणार मौन; आज दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

बंडानंतर सचिन पायलट सोडणार मौन; आज दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

कॉंग्रेसने पायलट यांना उपमुख्यमंत्री, विश्वेंद्रसिंग यांना पर्यटनमंत्री, रमेश मीणा यांना अन्नमंत्री पदावरून काढून टाकले

  • Share this:

जयपूर, 14 जुलै : राजस्थानमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट आपली बाजू मांडू शकतात. उपमुख्यमंत्री आणि पीसीसी प्रमुखपदावरून काढून टाकल्यानंतर आता सचिन पायलट आज (15 जुलै) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊ शकतात.

सचिन पायलट यांच्या वतीने पक्षाच्या कारवाईबाबत आतापर्यंत कोणतेही थेट विधान आलेले नाही. त्यांनी एक ट्विट केले आहे,  - सत्याला त्रास देऊ शकता, मात्र त्याचा पराभव होऊ शकत नाही. यानंतर पायलट यांनी आपल्या समर्थकांना धन्यवाद दिले आहेत

हे वाचा-भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कर्मचाऱ्यांसह 75 नेत्यांना संसर्ग

अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभागी होण्याच्या आरोपाखील सचिन पायलट यांना बर्खास्त करण्यात आले आहे. सायंकाळी उशीर त्यांनी आपलं समर्थन करणाऱ्यांचे धन्यवादन दिले आहे. त्यानंतर विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांनी पदावरुन हटविण्याचे कारण विचारले. काँग्रेसने पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन तर विश्वेंद्र सिंह यांना पर्यटन मंत्री, रमेश मीणा यांना खाद्य मंत्री पदावरुन हटविण्यात आलं. पार्टीने यावर सांगितले की पायलट आणि काही मंत्री भाजपच्या षडयंत्रात येऊन राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अशोक गहलोत सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सामील झाल्याबद्दल मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलेले सचिन पायलट यांनी संध्याकाळी उशिरा ट्विटवर पाठिंबा दर्शविलेल्या लोकांना 'राम-राम सा' लिहिले, विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीणा यांनी त्यांना विचारले त्यांनी कोणती चूक केली? उल्लेखनीय आहे की कॉंग्रेसने पायलट यांना उपमुख्यमंत्री, विश्वेंद्रसिंग यांना पर्यटनमंत्री, रमेश मीणा यांना अन्नमंत्री पदावरून काढून टाकले.

Published by: Meenal Gangurde
First published: July 14, 2020, 11:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading