राज्यसभेच्या गदारोळाने सचिनचा आवाज दाबला

राज्यसभेच्या गदारोळाने सचिनचा आवाज दाबला

आज राज्यसभेत सचिन तेंडुलकर राईट टू प्ले या विषयावर बोलण्यास उभा राहिला होता. क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करणाऱ्या सचिनचा आवाज दाबला गेला.

  • Share this:

21 डिसेंबर: राज्यसभेत खासदार म्हणून निवडला गेल्यापासून पहिल्यांदाच भारतरत्न  सचिन तेंडुलकर बोलण्यास उभा राहिला होता. पण राज्यसभेतील गदारोळामुळे त्याला बोलताच आलं नाही आणि अखेर ताटकळत उभं राहावं लागलं

गंमत झाली अशी की आज राज्यसभेत सचिन तेंडुलकर राईट टू प्ले या विषयावर बोलण्यास उभा राहिला होता.  क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करणाऱ्या सचिनचा आवाज दाबला गेला. तो  उभा राहिला तेव्हा काँँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली होती. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी मनमोहन सिंह यांच्यवर टीका केली होती. त्याचा परिणामी मोदींनी मनमोहन सिंह यांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदार करत होते. तशा घोषणाही त्यांनी दिल्या.या गदारोळामुळे व्यंक्कया नायडू यांनी राज्यसभा 11 वाजेपर्यंत तहकूब केली. अखेर सचिनला आपलं मत मांडताच  आलं नाही.

त्यामुळे आता सचिन आपला मुद्दा मांडण्यासाठी परक कधी उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 03:31 PM IST

ताज्या बातम्या